मुंबई : डोंबिवलीमध्ये पाणीटंचाईचे दुर्भिक्ष्य असतानाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली. पाणी टंचाईमुळे गायकवाड कुटुंब कपडे धुण्यासाठी शनिवारी संदप गावातील खदानीवर आले होते. कपडे धूत असताना मुले पाण्यात खेळायला गेली. पाण्याचा अंदाज न आल्याने ती बुडू लागली, त्यांना वाचविण्यासाठी बाकी लोकांनी पाण्यात उड्या मारल्या. व त्यांच्या सोबत ते हि बुडाले. अपेक्षा गायकवाड (30), मीरा गायकवाड (55), मयुरेश गायकवाड (15), मोक्ष गायकवाड (13) निलेश गायकवाड (15) अशी मृत्यू झालेल्यांची नावे असून हे सर्व देसलेपाडा येथील राहणारे होते.