"जामीन मिळाला; पण अजून न्याय मिळायचाय." : चंद्रकांतदादा पाटील

    04-May-2022
Total Views |

chandrakant
 
 
 
 
मुंबई : "खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना जामीन मिळाला पण अजून न्याय मिळायचाय.", असे म्हणत भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष्य चंद्रकांतदादा पाटील यांनी ठाकरे सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. ट्वीटर या समाजमाध्यमावर त्यांनी यासंदर्भात पोस्ट केल्याचे समोर आले आहे. " 'हनुमान चालीसा म्हटली म्हणून राजद्रोहाचा गुन्हा लावून राणा दांपत्यांना तुरुंगात का डांबलं? तुरुंगात त्यांना त्रास का देण्यात आला? हिंदुत्वाची मुस्कटदाबी कण्याचा प्रयत्न का केला? हे स्पष्ट झाल्यावर राणा दांपत्यास न्याय मिळेल." असे चंद्रकांतदादा पाटील यांचे म्हणणे आहे.    
 
 
 
 
 
 
भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची पत्रकार परिषद :