अहमदनगर : "आम्ही पुण्यश्लोक अहिल्याबाईंचे दर्शन घेणार, तिथली माती कपाळाला लावणार आणि पवार अँण्ड पवार कंपनीविरोधात बहुजनांचा लढा उभारणार" असा इशारा सदाभाऊ खोत यांनी चौंडीतून दिला आहे. पवार आणि कंपनीच्या ब्रिटिशांसारख्या प्रत्येक जिल्ह्यात वखारी आहेत आणि त्या वखारींच्या माध्यमातून महाराष्ट्रातील बहुजन समजला लुटण्याचे काम चालू आहे अशा शब्दांत सदाभाऊ खोत यांनी पवारांवर टीका केली आहे.
या राज्यात देवेंद्र फडणवीसही मुख्यमंत्री होते , तेही पंढरपूरला विठ्ठलाची पूजा करायला जायचे पण त्यांनी कधी वारकऱ्यांना दर्शन घेण्यासाठी रोखले नाही, मग आता आम्हांला रोखणारे हे कोण ? असा सवाल सदाभाऊंनी विचारला आहे. तुम्ही फक्त राजकारणासाठी इथे आला आहात, तुमच्या मनात अहिल्याबाईंच्या बद्दल काहीच आदर नाही, चौंडीत येण्यापासून तुम्ही आम्हांला अडवता, चौंडी तुमच्या बापाची आहे काय? असा थेट सवाल सदाभाऊंनी केला आहे.