पंतप्रधान नरेंद्र मोदी आज साधणार अनाथ बालकांशी ऑनलाईन संवाद

ठाणे जिल्ह्यातील ४३ बालके ‘वेबकास्ट’द्वारे होणार सहभागी

    30-May-2022
Total Views |

thane 2
 
 
 
 
 
ठाणे : ‘प्रधानमंत्री केअर फॉर चिल्ड्रेन्स’ (पीएम केअर) या योजनेअंतर्गत सोमवार, दि. ३० मे रोजी अनाथ बालकांना लाभ वितरण कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘वेबकास्ट’/‘व्हिडिओ कॉन्फरन्स’द्वारे देशभरातील निवडक अनाथ बालकांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमामध्ये ठाणे जिल्ह्यातील अनाथ मुलेही सहभागी होणार आहेत. यावेळी जिल्हास्तरीय कार्यक्रमात जिल्ह्यातील ४३ अनाथ बालकांना स्नेह प्रमाणपत्र व पंतप्रधान मोदी यांचे पत्र देण्यात येणार असून विविध लाभांचे वितरणही यावेळी करण्यात येणार आहे.
 
 
 
‘प्रधानमंत्री केअर फॉर चिल्ड्रेन्स योजने’अंतर्गत अनाथ बालकांसाठी विविध लाभ देण्यात येतात. या अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवारी देशभरातील अनाथ बालकांशी ‘व्हर्च्युअल’ पद्धतीने संवाद साधणार आहेत. यामध्ये १८ वर्षांवरील काही अनाथ मुले प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी उपस्थित असणार असून अन्य मुले ही ‘वेबकास्ट’द्वारे कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात ठाणे जिल्ह्यातील ४३ अनाथ बालकेही या कार्यक्रमात जिल्हाधिकारी कार्यालयातून सहभागी होणार आहेत. या बालकांना पंतप्रधान यांचे पत्र, ‘पीएम केअर योजने’चे स्नेहप्रमाणपत्र, ‘आयुष्यमान भारत विमा योजने’चे कार्ड, पोस्ट खात्याचे पासबुक आदींचे वितरण जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील या बालकांचे सध्याचे पालक/नातेवाईक, लोकप्रतिनिधी, बालकल्याण समितीचे सदस्य, बाल न्याय मंडळाचे सदस्य हेही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.