समाजशील मनाचा ‘टायगर’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-May-2022   
Total Views |
 
 
 
police
 
 
 
 
सामान्यांसाठी सत्वशील वृत्तीचे, कॉलेजमध्ये खोखो-कबड्डीमध्ये ‘टायगर’ नावाची उपमा लाभलेले व्यक्तिमत्त्व म्हणजेच प्रमोद छबुराव नागरे. 
 
 
 
 
दिवाळी असो वा दसरा
रमजान असो या ख्रिस्मस
कोणत्याही सणाला स्वतःच्या
घरी सण साजरा करायला नसतात
कुटुंब कबिला सारुन मागे
निवारण्या प्रश्न समाजाचे
विसरुनी सुख-दुःख स्वतःचे
ते जगासाठी उभे राहतात
 
 
खरंच सणवार, सुखदुःख, ऊन-पाऊस, ‘लॉकडाऊन’, कोरोना काहीही असो, आपले घरदार सर्व काही सोडून पोलीस दलातील सर्वजण ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ असे ब्रीदवाक्य म्हणत रात्रंदिन समाजाच्या सेवेसाठी उभे असतात. पोलीस म्हटले की, दरारा आला, भीती आली... असाच एक पोलीस दलातील गुन्हेगारांचा कर्दनकाळ आणि सामान्यांसाठी सत्वशील वृत्तीचे, कॉलेजमध्ये खोखो-कबड्डीमध्ये ‘टायगर’ नावाची उपमा लाभलेले व्यक्तिमत्त्व म्हणजेच प्रमोद छबुराव नागरे.
 
 
प्रमोद नागरे यांचा जन्म संगमनेर येथील शेडगाव येथे झाला. वडील छबुराव शेतकरी, तर आई सुभाद्राबाई गृहिणी. प्रमोद यांचे प्राथमिक शिक्षण गावाकडच्या जिल्हा परिषद शाळेत, माध्यमिक शिक्षण केबीपीव्ही हायस्कूल येथे झाले. सह्याद्री कॉलेजमधून अकरावी-बारावीपर्यंतचे शिक्षण, तर संगमनेर कॉलेजमधून एफवायबीए झाले.
 
 
त्यांच्या घरची परिस्थिती बेताचीच. अगदी स्पष्ट शब्दांत सांगायचे झाले, तर दहावीपर्यंत एक हाफ पँट व एक हाफ शर्ट अंगावर तर दुसरा धुवून दोरीवर... अंगभर कपडे घेण्यासाठी त्यांना अकरावीपर्यंत वाट पाहावी लागली. आईच्या आईने अर्थात आजीने अकरावीत गेल्यावर प्रमोद यांना पहिल्यांदा फुल पँट आणि फुल शर्ट घेतला, तेव्हा कुठे अंगभर कपडे घालायचा आनंद त्यांना मिळाला. याही प्रतिकूल परिस्थितीत मोठ्या आनंदाने त्यांनी शाळेचे शिक्षण घेतले. शिक्षण घेता घेता शाळेत स्वत:ची खेळाची आवडसुद्धा जपली.
 
 
खोखो-कबड्डीया खेळांमधील त्यांचे प्राविण्य शाळेत आणि परिसरामध्ये नावाजले जात होते. आपल्या खेळातील कौशल्यातून त्यांनी शाळेला अनेक पदके, प्रमाणपत्रे आणि मानसन्मान मिळवून दिले आहेत. त्यांच्या दमदार खेळामुळे शाळेमध्ये शिक्षक व मित्रांमध्ये ते ’टायगर’ म्हणून ओळखले जात असत. शालेय जीवनात ‘टायगर’ म्हणून चिकटलेली बिरुदावली मुंबई पोलीस दलात गेल्यावरही कायम राहिली. त्यांनी आपल्या पोलीस सेवेतील कारकिर्दीत वाघाप्रमाणे निधड्या छातीने काम करून ’टायगर’ हे बालपणीचे नाव सार्थ ठरवले आहे.
 
 
दरम्यान, गावात राहत असतानाच १९८३ साली गावातल्या गंगा-जमुना मळ्यामध्ये गणेशोत्सव साजरा होत असताना शेवटच्या दिवशी वर्गणीवरून वाद झाले. खरेतर सर्व काही आलबेल होतं. परंतु, वर्गणीमधून जमवलेल्या पैशाचा गणपती उत्सवासाठी उपयोग करायचा, असा त्यांचा प्रयत्न होता. परंतु, काही कारणामुळे विरोध होऊ लागल्याने त्यांना ते राहवले नाही आणि ते एकटे पडले. गणपती विसर्जन झाल्यावर भांडणतंटे नको म्हणून त्यांचे मामा बाळासाहेब उगलमुगले यांनी त्यांना त्यांचे मेव्हणे देवराम गीते यांच्याकडे मुंबई येथे घेऊन आले व तेथे राहण्याची सोय केली.
 
 
तेथे पोट भरण्यासाठी काही कामे केली. मामांचा आशीर्वाद व त्यांचे मनोधैर्य मेहनत आणि गरीब परिस्थितीवरती मात करून १९८७ मध्ये पोलीस दलात भरती होऊन त्यांनी आपले स्वप्न पूर्ण केले. अंधेरी-मरोळ येथे नऊ महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर वरळी मुख्यालय येथे १९८८ मध्ये सुरुवात करुन वरळी, ताडदेव, नायगाव, ठाणे असे पाच पोलीस हेडक्वार्टर तसेच माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाणे, विटी येलो गेट, पंतनगर मुलुंड त्यानंतर ‘सीआयडी’नंतर २००९ मध्ये ठाणे शहर मुख्यालय नारपोली भिवंडी, मानपाडा, महात्मा फुले, अशा विविध पोलीस ठाणे विभाग यांमधून आपल्या सेवेचा ठसा उमटवला.
 
 
२०१३ मध्ये खात्याअंतर्गत परीक्षा देऊन पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंतची बढती प्राप्त केली. २०१९ मध्ये महात्मानगर पोलीस ठाणे, कल्याण येथे त्यांची बदली झाली. या संपूर्ण प्रवासात त्यांना अनेक वरिष्ठांचे, आयपीएस अधिकार्‍यांचे मार्गदर्शन लाभले. विशेषत्वाने एस. पी. एस. यादव यांच्याकडून त्यांना केवळ मार्गदर्शनच लाभले नाही, तर पोलीस दलातील सेवेचा परिपाठ, खाचखळगे यांची माहिती मिळाली.
 
 
नागरे यांच्या जीवनात असे एक ना अनेक आव्हानात्मक प्रसंग आले. या सर्व प्रसंगातून त्यांनी दमदारपणे वाटचाल करीत आपले सेवाकार्य केले. आपल्या 36 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी पाच हेड क्वार्टर, सात पोलीस ठाणे, एक विशेष शाखा येथे सेवा बजावली आणि प्रत्येक ठिकाणी आपली छाप सोडली. एवढ्या विविध ठिकाणी कार्य करणारी नागरे यांच्यासारखी पोलीस दलातील डाग विरहित व्यक्ती महाराष्ट्रात क्वचितच असेल.
 
 
सरळसोट मार्गाने धडाकेबाजपणे कार्य करणारे नागरे आपल्या नोकरीप्रमाणे समाजाशी नाळ जोडून आहेत. वंजारी समाज मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, वधू-वर सूचक मेळावे, लग्न सोहळे, विद्यार्थी सन्मान अशा अनेक सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रमांमध्ये नागरे सक्रियपणे सहभागी असतात. त्यांचा मोठा मित्रपरिवार आहे, त्यांनासुद्धा वेळ देऊन खेळीमेळीचे वातावरण ठेवण्याचे कार्य ते व्हॉट्सअ‍ॅप च्या माध्यमातून करीत असतात. वाचन आणि नाटके पाहणे, ही नागरे यांची आवड आहे.
 
आपल्या पोलीस दलातील सेवेचे प्रेरणास्थान म्हणून आपले मामा बाळासाहेब उगलमुगले यांचा आवर्जून उल्लेख करतात. या प्रवासात त्यांच्या पत्नी अनिता यांचे त्यांना मोठे पाठबळ लाभले आहे. अनिता यांनी घराची बसविलेली व्यवस्थित घडी, मुलांचे संगोपन, पतीला दिलेली सकारात्मक प्रेरणा यामुळे नागरे यांचे कर्तृत्व बहरुन आले.
 
 
त्यांची दोन्ही मुले आज व्यवस्थित आपल्या पायावर उभी आहेत. मुलगा समीर याने बीए पूर्ण करून मल्टिमीडिया व अ‍ॅनिमेशन अभ्यासक्रम पूर्ण करून मास मीडियामध्ये कार्यरत आहे, तर मुलगी रुपाली या बीए झाल्या असून त्या विवाहित आहेत. पोलीस दलातील सेवा, समाजबांधव यांच्याशी संबंधित कार्य या सोबत कुटुंब आणि मित्र यांचेशी असलेले नाते जपण्याचा कसोशीने प्रयत्न करतात. अशा या हरहुन्नर व्यक्तिमत्त्वाला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा....!
 
 
 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@