पुणे : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना ‘सीबीआय’ने बेड्या ठोकल्या आहेत. ‘डीएचएफएल’ घोटाळा प्रकरणात ही कारवाई झाल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्रातील मंत्री विश्वजित कदम यांचे ते सासरे होत. अविनाश भोसले यांच्यावर ‘डीएचएफएल बँक’ घोटाळ्याप्रकरणी ‘सीबीआय’ने ही कारवाई केली आहे. भोसले यांचे नाव ‘येस बँक’ घोटाळाप्रकरणीही चर्चेत होते. या दोन्ही प्रकरणाची ‘सीबीआय’ने चौकशी सुरू केली होती. शिवाय याप्रकरणी पुणे-मुंबई परिसरातील तब्बल आठ ठिकाणी छापेमारी केली होती. या छाप्यातून ‘सीबीआय’च्या हाती काही महत्त्वाचे धागेदोरे लागल्याचे वृत्त आहे. त्यातूनच ही कारवाई करण्यात आली आहे.