नवी मुंबई : मंगळवार दि. २४ मे रोजी मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनी व भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र येथील मान्सूनपूर्व देखभाल व दुरूस्तीचे कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र येथील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली या विभागात मंगळवार दि. २४ मे रोजी सायंकाळी पाणी पुरवठा होणार नाही. तसेच या कालावधीत मनपा क्षेत्रातील जलवाहिनीवरील थेट नळ जोडण्यांचा व सिडको क्षेत्रातील कामोठे व खारघर नोडमधील नवी मुंबई मनपाकडून होणारा पाणी पुरवठा देखील बंद राहणार आहे. तसेच बुधवार दि. २५ मे रोजी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. दरम्यान, या कालावधीत पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करण्याचे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.