भारतातील विविध प्रकारच्या गृहकर्जांचा वापर नवीन घर, अपार्टमेंट किंवा जमिनीचा तुकडा खरेदी करण्यासाठी आणि जुनी मालमत्ता नूतनीकृत, विस्तारित आणि पुनर्स्थापित करण्यासाठी करणे शक्य आहे. त्यामुळे एखादे गृहकर्ज तुमचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी कशा प्रकारे मदत करते याबद्दल माहिती देणारा हा लेख...
स्थिरस्थावर होण्यासाठी घर खरेदी करणे महत्वाचे आहे. अनेक व्यक्तींसाठी स्वतःचे घर असणे हे आयुष्यभराचे सत्यात उतरणारे ध्येय आहे परंतु ते प्रचंड महागडेही आहे. ग्राहकाच्या बजेटमध्ये स्वप्नातील घर बसवण्याची सर्वांत महत्त्वाची पद्धत म्हणजे गृहकर्ज घेणे ही आहे. भारतीय धनकोंकडून त्यांच्या ग्राहकांच्या मागण्या अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यासाठी विविध प्रकारची गृहकर्जे दिली जातात.
गृहकर्जाचे प्रकार :
जमीन खरेदी कर्ज : अनेक संस्था जमीन खरेदी करण्यासाठी कर्जे देतात. जमीन खरेदी हा लवचिक पर्याय आहे. ग्राहक पैशांची बचत करून त्यांच्या बजेटमध्ये असेल तेव्हा घर खरेदी करू शकतात किंवा ते एखादी मालमत्ता एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून राखून ठेवू शकतात. अॅक्सिस बँकेसारख्या कर्ज कंपन्या जमीन खरेदीच्या एकूण खर्चाच्या ८५ टक्क्यांपर्यंत कर्ज देतात.
घर खरेदी कर्ज : गृहकर्जांच्या संदर्भात सर्वाधिक सर्वसामान्य प्रकारचे कर्ज म्हणजे नवीन किंवा आधी दुसऱ्या व्यक्तीच्या मालकीचे घर घेण्यासाठी कर्ज होय. हे कर्ज व्यापक स्वरूपात सहजसाध्य आहे आणि ते विविध स्वरूपात विविध प्रकारच्या वित्तीय संस्थांकडून दिले जाते. व्याजदर एकतर चलित किंवा स्थिर असू शकतो आणि तो सामान्यतः दररोज ९.८५ टक्के ते ११.२५ टक्क्यांदरम्यान असतो. त्याचबरोबर विविध बँका एकूण रकमेच्या जवळपास ८५ टक्क्यांपर्यंत कर्ज देण्यास तयार असतात.
घर बांधणी कर्ज : हे कर्ज ज्या व्यक्तींना विशेषतः आधीच निश्चित असलेल्या रचनेतील घर खरेदी न करता आपल्या आवश्यकतांप्रमाणे घर बांधायचे आहे त्यांच्यासाठी तयार केलेले आहे. या स्वरूपातील कर्जाची मान्यता प्रक्रिया खूप खास आहे, कारण त्यातून भूखंडाचा खर्च आणि कर्जाची रक्कम विचारात घेतली जाते. घरबांधणी कर्जासाठी अर्ज करत असताना लक्षात ठेवण्याचा एक महत्त्वाचा म्हणजे मुद्दा भूखंडाची किंमत कर्जाच्या रकमेत समाविष्ट करण्यासाठी मालमत्ता ही एक वर्षाच्या आत खरेदी केलेली असली पाहिजे. कर्जाची रक्कम ही बांधकाम खर्चाच्या सुमारे अंदाजाद्वारे निश्चित केली जाते. रकमा एकतर एकल एकत्रित किंवा अनेक लहान लहान रकमांमध्ये दिल्या जाऊ शकतात. बँक ऑफ बरोडा, युको बँक आणि कॅनरा बँक या काही वित्तीय संस्था आहेत ज्या लोकप्रिय घरबांधणी कर्जे देतात.
गृहकर्ज घेण्याचे फायदे :
करांच्या संदर्भातील फायदे : गृहकर्ज घेण्याचा सर्वांत महत्त्वाचा फायदा म्हणजे तुम्ही करत असलेल्या मुद्दलाच्या रकमेवर आणि व्याजावर तुम्ही प्राप्तीकरातील वजावट मिळवू शकता. तुम्ही कलम ८०सी अंतर्गत मुद्दल रकमेच्या परताव्यावर १.५ लाख रूपयांपर्यंत, कलम २४बी अंतर्गत व्याज रकमेच्या परताव्यावर २ लाख रूपये, कलम ८०ईई आणि ८०ईईए अंतर्गत अभूतपूर्व परिस्थितीत व्याज रकमेच्या प्रदानावर २ लाख रूपयांपर्यंत आणि कलम ८०सी अंतर्गत मुद्रांक शुल्काच्या खर्चावर १.५ लाख रूपयांपर्यंत दावा करू शकता. तुम्ही कलम २४बी अंतर्गत व्याजाच्या परताव्यावर २ लाख रूपयांपर्यंत, कलम ८०ईई आणि ८०ईईअंतर्गत विशिष्ट परिस्थितीत व्याजाच्या परताव्यावर २ लाख रूपयांपर्यंत आणि अधिक दावा करू शकता.
व्याजदर कमी होऊ लागले आहेत : गृहकर्जावरील व्याजदर हे उपलब्ध असलेल्या इतर कोणत्याही कर्जाच्या प्रकारापेक्षा खूप कमी आहेत. त्यामुळे तुम्ही आर्थिक अडचणीत असल्यास तुम्हाला तुमच्या सध्याच्या गृहकर्जाला पूरक ठरेल असे कर्ज पर्सनल लोनपेक्षा कमी दरात घेऊन परिस्थितीवर मात करू शकता.
भूखंडाची सखोल चौकशी : तुम्ही बँकेच्या माध्यमातून घर खरेदी करता तेव्हा बँक मालमत्तेची सखोल चौकशी करेल आणि तुम्ही देत असलेली कोणतीही कागदपत्रे कायदेशीर आहेत की नाहीत हे ठरवेल. बँकेकडून केली जाणारी ही सखोल चौकशी तुम्ही एखाद्या घोटाळ्याला बळी पडण्याची शक्यता कमी करेल. बँकेने मालमत्ता प्राधिकृत केली आहे असे गृहित धरल्यास तुम्ही आणि तुमचे घर चांगल्या हातात आहात असे मानता येईल.
कर्ज परताव्याचा दीर्घ कालावधी : इतर प्रकारच्या कर्जांच्या विरूद्ध गृहकर्जांचा परतावा कालावधी दीर्घकालीन असतो. हा अनेकदा २५-३० वर्षे असतो. हे एखादे घर खरेदी करण्यासाठी आवश्यक असलेल्या मोठ्या रकमेमुळे घडते. जास्त विस्तारित कालावधीवर कर्जाची रक्कम आणि लागू असलेला व्याजदर विस्तारित केल्यामुळे मासिक हप्ते कमी होतात आणि कर्जदाराचा भार कमी होतो.
आधी परतावा केल्यास दंड नाही : तुम्ही चालू दराने गृहकर्ज घेता तेव्हा तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसे असतील तेव्हा तुम्ही तुमच्या हातात असलेल्या पैशांचा भरणा करून कर्जाचा आधीच परतावा करू शकता. त्यासाठी कोणताही प्रीपेमेंट दंड किंवा व्याजदर लागू होत नाही. यामुळे तुम्हाला तुमच्या नियत कर्ज कालावधीपेक्षा खूप आधी गृहकर्जाचा परतावा करता येईल.
शिल्लक रकमांच्या हस्तांतरणासाठी सुविधा : एका धनकोकडून तुमचे गृहकर्ज दुसऱ्या धनकोकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय विविध घटकांवर आधारित असू शकतो. जसे व्याजदर, शुल्क आणि ग्राहक सेवा अनुभव इत्यादी.
कोणते गृहकर्ज सर्वात फायदेशीर आहे?
सर्वोत्तम गृहकर्जाच्या बाबतीत तुमची गरज महत्त्वाची असते. तुमच्या विशिष्ट आर्थिक गरजांना अनुसरून तयार करण्यात आलेल्या योग्य कर्ज प्रकारासाठी अर्ज करण्याच्या माध्यमातून तुम्हाला कर्ज मिळण्याची शक्यता आता वाढली आहे. कर्ज घटकांवर आरबीआयचा देखील प्रभाव आहे आणि कर्जदाता कायद्यांनुसार गृहकर्ज व्याजदर निर्धारित करतो. कर्ज-ते-मूल्य प्रमाण अधिकतम ९० टक्क्यांपर्यंत मर्यादित करणे हे एक उदाहरण आहे.
या करारांमध्ये सध्याचे व्याजदर व कर्ज अटींचा देखील समावेश आहे. गृहकर्ज पात्रता कॅल्क्युलेटर देखील तुम्हाला कर्जासाठी तुम्ही पात्र आहात की नाही हे ठरवण्यास मदत करू शकतो. तुम्हाला सर्वोत्तम गृहकर्ज पाहिजे असेल तर योग्य कर्ज प्रकार, त्याचे फायदे माहित असणे आणि सर्वोत्तम कर्जदाताशी संपर्क साधणे अत्यंत आवश्यक आहे.
व्याजदरांच्या बाबतीत फिक्स्ड-रेट व अॅडजस्टेबल-रेट असे दोन प्रकारची गृहकर्जे आहेत :
फिक्स्ड-रेट गृहकर्ज : निश्चित व्याजदरासह गृहकर्ज तुम्हाला तुमचे मासिक पेमेंट काटेकोरपणे जाणून घेण्याची सुरक्षा देते.
फ्लोटिंग-रेट गृहकर्ज : हा प्रकार व्याजदर कमी झाल्यास त्याचा लाभ देते. दुसरीकडे विद्यमान बाजारपेठ स्थितीमुळे व्याजदर वाढू शकतात. गृहकर्ज काय आहे हे तुम्हाला उत्तमरित्या माहित असेल तर तुमच्या विद्यमान व भावी घराच्या मागण्यांची पूर्तता करण्यासंदर्भात अधिक योग्य निर्णय घेण्यास मदत होऊ शकते.
- अमित कुमार अग्रवाल
(नोब्रोकरचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी)