इद हुसेन हा जन्माने ब्रिटिश नागरिक. तो राजकीय वर्तुळात वावरणारा, लेखक, पत्रकार आणि अमेरिकेतील विद्यापीठांमधे मुस्लीम समाजावर अभ्यासक आणि लेखक म्हणून अभ्यागत प्राध्यापकाचे काम करतो. त्याचे नवे पुस्तक 'Among the Mosque’ (२०२१ मध्ये प्रकाशित)इंग्लंडमधील वाढत्या कैरानांचा आढावा घेणारे आहे. त्याने इंग्लंडमधील मुस्लीम वस्त्यांमध्ये बांधल्या गेलेल्या मशिदींना प्रत्यक्ष भेटी देऊन त्यांची माहिती घेतली. त्या भागात मुस्लीम वस्ती कशी वाढत गेली, यांची स्थानिक मुस्लीम तसेच संपर्कात आलेल्या गोर्या नागरिकांशी संवाद साधून मिळवली. ती त्याने कुठलाही आडपडदा न ठेवता पुस्तकात मांडली आहे.
गेल्या काही वर्षांत भारतात कैराना गावाचे नाव एका विशिष्ट प्रकारच्या सामूहिक स्थलांतरांशी जोडले गेले. भारतात इतर ठिकाणी घडणार्याअशा घटनांना कैरानाशी जोडून पाहिले जाते. या कैरानांची विशेषता म्हणजे, मुस्लीम समाजाकडून एखाद्या हिंदूबहुल वस्तीतील मोक्याच्या जागेवरील घर विकत घेतले जाते. तेथे काही मुस्लीम तरुण ठरवून टारगटपणा सुरू करतात. येणार्या जाणार्या मुली आणि तरुण महिलांवर शेरे मारणे, त्यांच्या खोड्या काढणे, त्यांच्या आजूबाजूला घोटाळणे इ. सुरू करतात.
जोवर उ. प्रदेशात मायावती आणि अखिलेश यांची सत्ता होती, तोवर या टवाळखोर आणि गुंडांच्या तक्रारी पोलीस नोंदवून, तर घेत नव्हतेच, पण ज्या कुटुंबाकडून अशी तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न झाला, त्या कुटुंबातील मुलीबाळी आणि महिलांना अधिक त्रासाला सामोरे जावे लागे. हळूहळू त्या वस्तीतील हिंदू कुटुंबे आपला कोणी वाली नाही, हे समजून मिळेल त्या पडेल किंमतीला घर विकून जाऊ लागत. एकेकाळी चढ्या भावाने विकली जाणारी घरे विकत घेण्यासाठी कोणी हिंदू पुढे येण्यास धजावत नसे. ती कुटुंबे ‘ये मकान बेचना हैं’ अशा पाट्या घरावर लावून दुसरीकडे स्थलांतर करीत.
एका झटक्यात अशी अनेक घरे खाली झाली आणि एकमेकाला लागून असलेल्या गल्लीत हे झाले की, ती घरे कौडीमोलात घेण्यासाठी मुसलमान गिर्हाईके येत. बघता बघता ती मोक्याच्या ठिकाणची वस्ती मुस्लीमबहुल होई. त्याची एक पद्धती मुस्लीम समाजाने सहज प्रगत केली, अशा वस्त्या अनेक ठिकाणी तयार होत गेल्या. ही पद्धत केवळ भारतातच नव्हे, तर इतर पाश्चात्य देशांमधून यशस्वीपणे अंमलात आणली जाते आहे. त्या प्रकारच्या इंग्लंडमधील घटनांचे संकलन एका ब्रिटिश मुस्लीम लेखकाने केले आहे.
मशिदींची गावे
इद हुसेन हा जन्माने ब्रिटिश नागरिक. तो राजकीय वर्तुळात वावरणारा, लेखक, पत्रकार आणि अमेरिकेतील विद्यापीठांमधे मुस्लीम समाजावर अभ्यासक आणि लेखक म्हणून अभ्यागत प्राध्यापकाचे (adjunct Professor) काम करतो. त्याच्या पुस्तकांची शीर्षके 'The Islamist', 'The House of Islam' ही बोलकी आहेत. त्याचे नवे पुस्तक Among the Mosque' (२०२१ मध्ये प्रकाशित)इंग्लंडमधील वाढत्या कैरानांचा आढावा घेणारे आहे. त्याने इंग्लंडमधील मुस्लीम वस्त्यांमध्ये बांधल्या गेलेल्या मशिदींना प्रत्यक्ष भेटी देऊन त्यांची माहिती घेतली.
त्या भागात मुस्लीम वस्ती कशी वाढत गेली, यांची स्थानिक मुस्लीम तसेच संपर्कात आलेल्या गोर्या नागरिकांशी संवाद साधून मिळवली. ती त्याने कुठलाही आडपडदा न ठेवता पुस्तकात मांडली आहे. तो एक नमूद करतो की, गेल्या काही दशकांत इंग्लंडमध्ये मशिदींची संख्या एकाएकी वाढली. ती वाढ जुन्या मुस्लीम वस्त्यांपासून सुरू होऊन झपाट्याने पूर्ण देशात पसरली. काही गावेच्या गावे बघता बघता मुस्लीमबहुल बनली.
कैरानावाढींची सामाजिकता
या पुस्तकात हुसेनने स्थानिक मुस्लिमांशी संवाद साधताना त्यांची इंग्लंडपूर्व पार्श्वभूमी जाणून घेतली आहे. हे करताना त्याला अरबीत बोलता येण्याचा फायदा झाला. आजच्या घटकेला इंग्लंडमध्ये टॅक्सी व्यवसाय मुस्लीम, त्यातही सुन्नी मुस्लिमांच्या हातात गेला आहे. स्थानिक टॅक्सीवाल्यांशी अरबीतून बोलले की, तो लगेच खुलून मन मोकळे करत असल्याचा अनुभव हुसेन अनेकदा नमूद करतो.
मुस्लीम वस्त्यांतील या भ्रमंती दरम्यान हुसेनने ड्यूजबरी, मँचेस्टर, ब्लॅकबर्न, ब्रॅडफोर्ड, बर्मिहॅम, कार्डिफ, बेलफास्ट, एडिन्बर्ग आणि ग्लासगो व लंडन या ठिकाणच्या मशिदी आणि मुस्लीम शैक्षणिक संस्थांना भेटी दिल्या. तेथे त्याला आलेले अनुभव लक्षात घेता, जगभरातील मुस्लीम मानसिकतेवर प्रकाश पडतो. अनेक ठिकाणच्या मशिदींच्या परिसरात त्याला तबलिगी जमातीचे सदस्य मोठ्या प्रमाणावर वावरताना दिसले. ते सर्व तबलिगी पंथाच्या प्रसारात गुंतलेले होते. इंग्लंडमध्ये जन्मलेल्या नव्या पिढीला धर्मशिक्षण देण्यावर त्यांचा भर होता (पृ. ९). त्या पाठोपाठ दुसरी डोळ्यात भरणारी जमात देवबंदींची होती. त्या मानाने बरेलवी जमातीचे लोक बरेच माघारलेले होते.
ड्यूजबरीच्या टॅक्सीवाल्याने लांब दाढी आणि डोक्यावर स्कलकॅप घातली होती. त्याची दोन्ही मुले तेथेच राहून धार्मिक शिक्षण घेत होती. त्याच्याकडून त्याला समजले की, इंग्लंडमधील मुस्लीम तेथे खिलाफत स्थापन करण्याचे ठरवून त्या दिशेने वाटचाल करत आहेत. तबलिगी जमातीला इंग्लंडमध्ये खिलाफत स्थापन करायची आहे. त्यासाठी ते सामान्य माणसाचे त्यांच्या इस्लाममध्ये परिवर्तन करण्यावर भर देत आहेत. दुसरे त्याला लक्षात आले की, इतर मुस्लीम देशांमध्ये स्थानिक मशिदींमध्ये प्रवेश करणार्याला प्रतिबंध केला जात नाही. इंग्लंडमध्ये मात्र कडेकोट बंदोबस्ताची व्यवस्था त्याला आढळली, हे विशेष. मँचेस्टरच्या मदरशात शिकविणार्या शिक्षिकेला बुरखा घालूनच जावे लागे. नोकरी सोडल्यावर पहिले काम तिने केले ते म्हणजे बुरखा काढून टाकला (पृ. ३२).
पै. मुहंमदांचा कुठल्याही प्रकारे अवहेलना अथवा उपमर्द जगात कुठेही होऊ नये, यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेबरोबर बोलणी करून तसा कायदा व्हावा, यासाठी तुर्की प्रयत्नशील आहे, अशी माहिती हुसेन देतो. त्याचवेळी पै. मुहंमदांची सर्वात लहान आणि आवडती पत्नी त्यांची खिल्ली उडवत असे की, त्यांना येणारे अल्लाचे आदेश त्यांना उपयुक्त ठरतील असेच येतात. तिने केलेली अल्लाच्या आदेशांची खिल्ली पैगंबर स्मित हास्य करून दुर्लक्ष करत असत (पृ ५८).
तबलिगी जमातीच्या लोकांची घरातील महिलांकडे तुच्छतेने पाहण्याची वृत्ती आणि २१व्या शतकात अतिरेकी अंधश्रद्धा बाळगण्याच्या प्रवृत्तीचे हुसेन उदाहरण देतो. ब्लॅकबर्नच्या झैनाबचा तबलिगी नवरा येता-जाता तिला झोडपत असे. पुढे जाऊन मुले मोठी झाल्यावर मध्ये पडून ते आईला सोडवत असत. बाहेर देवभिरू आणि प्रेमळ असणारा तो तबलिगी घरात मात्र बायकोचा कर्दनकाळ होता. एकदा तर स्वयंपाक करत असताना तिचा पदर डोक्यावरून ढळल्याचे पाहताच, तुझ्या अशा चवचाल वागण्यामुळे देवदूत घर सोडून गेल्याचा आरोप करत त्याने तिला ओढणीचा गळफास लावून मारण्याचा प्रयत्न केला. बाहेरचा दूरध्वनी त्याचवेळी आला म्हणून ती वाचली. तिचा अनुभव असा की, ज्या ज्या वेळी तो धर्मप्रसारासाठी गेला, तिथून परत आल्यावर त्याचा कट्टरपणा आणि धर्मांधळेपणा वाढत जाताना तिला जाणवला (पृ.१०३)
जिथे जिथे मशिदी बांधण्यात आल्या त्याच्या आसपासची गोर्या लोकाची दुकाने, पब एकाएकी ओसरत गेले, बंद होत गेले. तसेच, गोरे नागरिक तो भाग सोडून जाऊ लागले. ब्रॅडफोर्ड या गावातला हुसेनचा अनुभव कैरानाची आठवण करून देणारा आहे. या गावात त्याला विविध पंथांच्या मुस्लीम संस्थांचे जाळे दिसले. त्याची टॅक्सी चालक एहसान होता. तो १९६७ पासून ब्रॅडफोर्डचा रहिवासी होता. त्याने ब्रॅडफोर्डचा बदलता चेहरा पाहिला होता. २०२० मधे ब्रॅडफोर्ड हे पीर आणि इमाम चालवत असल्याचे एहसानने त्याला सांगितले. ज्या पीर मुनाफच्या ब्रॅडफोर्डमधे अनेक मशिदी आणि शैक्षणिक संस्था ब्रॅडफोर्डमध्ये आहेत, त्याला दोन वर्षांपूर्वी सौदी अरेबियात सौदी- इस्लाम विरोधात काम करतो म्हणून अटक झाली होती. ब्रॅडफोर्डमधून गोरे लोक निघून गेल्याचे त्याला वाईट वाटत होते. तो संवाद मुळातून देतो.
''Where are all the white English people of the city?'' I ask as we drive away from the city center. ''Gone with the wind.'' Ehsan says, looking in the eye via rear-view mirror. Road rage incident breaks out in front of us. Two asian drives hurl abuse at each other in Punjabi. There are basically no pubs left in Bradford, he says. Only about two. Before, there were seven pubs just here on (road) Duckswan.
ब्रॅडफोर्डचा चेहरामोहरा दोन-तीन दशकात पूर्ण बदलला. त्याचे कारण एहसान देतो. राजकीय नेते, मतांसाठी पीर, इमामांचे लांगूलचालन करतात. ते वैध अवैधरित्या मुस्लिमांना वसवून मतांची संख्या वाढवतात. अशा घटना हुसेनला ठिकठिकाणी घडलेल्या आढळल्या. कैरानातही असेच घडले.
या देशाचे भवितव्य?
निर्वासित मुसलमान प्रमाणाबाहेर वाढल्याने इंग्लंडमध्येच नव्हे, तर युरोपातही सामाजिक विसंवाद वाढला आहे. मुस्लीम वस्त्यांत वेगळे देशच A Nation within nation' आकार घेत आहेत (पृ. २८२-८३). धर्माच्या झेंड्याखाली एकवटलेल्या अल्पसंख्याकांनी वैचारिक आणि वागण्याचे स्वातंत्र्य मिळाल्यामुळे विभागलेल्या गोर्या बहुसंख्याकांना वेठीस धरले आहे. ब्रिटनमधील ६६ टक्के लोकांनी वाढत्या अतिरेकी इस्लामबाबत चिंता व्यक्त केली.
२०२० मध्ये इंग्लंडचा गुप्तहेर विभाग ४३ हजार खिलाफत समर्थकांवर पाळत ठेवून होता. हुसेन खरा राष्ट्रवादी मुस्लीम आहे. त्याला आपल्या देशाचे भवितव्य काय याची त्याला चिंता वाटते. त्याचे समारोपाचे प्रकरण (पृ. २८१-३०३) हे एका राष्ट्रीय मुस्लीम नागरिकाचे मनोगत आहे. ते मुळातून वाचण्यासारखे आहे. आपल्या भारताचे भवितव्य?