दि. २१ मे. हा दिवस ‘जागतिक सांस्कृतिक विविधता दिवस’ म्हणून साजरा केला जातो. २००१ साली अफगाणिस्तानमध्ये इस्लामिक कट्टरपंथीयांनी बामियानच्या ऐतिहासिक बुद्ध मूर्ती तोडल्या. ऐतिहासिक वारशाला क्रूरतेने नष्ट केले. सगळ्या जगाने या घटनेचा तीव्र निषेध केला. विविध धर्म, संस्कार, रितीरिवाज आणि श्रद्धा यांच्याबाबत जगभरात संवाद व्हावा, ओळख व्हावी, परस्परांच्या संस्कृतीबद्दल जगभरात आदर निर्माण व्हावा, यासाठी ‘युनेस्को’ने दि. २१ मे हा दिवस ‘जागतिक सांस्कृतिक विविधता दिवस’ म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले. इतर अनेक जागतिक दिवसांच्या विषयांपेक्षा हा दिवस खरेच महत्त्वाचा. कारण, आपली संस्कृती आपला धर्मच काय तो महान, बाकीच्यांना कवडीचीही किंमत नाही किंवा त्यात काही सत्य-तथ्य नाही, अशा गृहितकांवरच जगभरात घडामोडी घडताना दिसतात. युद्ध, धर्मांतर टोकाचा दहशतवाद असो की, अतिक्रमणवादी वृत्ती असो, या सगळ्यांच्या पाठी एकच कारण आहे आणि ते म्हणजे दुसर्याच्या संस्कृतीचा आणि धर्माचा तिरस्कार. त्यामुळेच तर पाकिस्तानात बलुचिस्तानमध्ये बलुची संस्कृतीचा नरसंहार केला जात आहे. आताही ज्ञानवापी सर्वेक्षणामध्येसापडलेल्या शिवलिंगासंदर्भात ज्या चर्चा चालल्या आहेत, त्यातूनही या सांस्कृतिक अपमानाचे विध्वंसक सत्य समोरे येते, असे समाजअभ्यासकांचे म्हणणे. कारण, शेकडो वर्षांनंतर बहुचर्चित शिवलिंग अशा ठिकाणी सापडले, जिथे लोक हातपाय धुतात आणि चुळा भरतात. समाजाच्या आस्थेचा, श्रद्धेचा अपमान करून स्वतःच्या धर्मसंस्कृतीची बेगडी खोटी महत्ता निर्माण करणे, हाच यात हेतू असतो.
याच पार्श्वभूमीवर कॅनडाची एक घटना चर्चेत आहे. सध्या प्रिन्स चार्ल्स आणि कॅमिला हे सध्या कॅनडच्या दौर्यावर आहेत. इथल्या वनवासी समाजाचे राजकीय नेतृत्व करणार्या रोझेन्ने अर्चिबाल्ड यांनी प्रिन्स चार्ल्स यांच्या मातोश्री यांनी तसेच अँग्लीकन चर्च संस्थेने कॅनडातील वनवासी समुदायाची माफी मागावी, अशी मागणी केली. या मागणीचे कारण आहे, ख्रिस्ती धर्म संस्कृतीच्या विस्ताराने इथल्या वनवासी समुदायाचा केलेला नरंसहार. १८६९ ते १९९७ या कालावधीत चर्चसंस्था आणि कॅनडा सरकारच्या अधिपत्याखाली १३९ निवासी वसतिगृह हेाते. १९९७ सालापर्यंत ही वसतिगृहं बंद झाली होती. २०९०८ साली या वसतिगृहांसंदर्भात अभ्यास करण्यासाठी कॅनडा प्रशासनाने ‘ट्रुथ अॅण्ड रिक्नसलियेशन’समिती स्थापित केली. या वसतिगृहांच्या जागेची रडारद्वारे पाहणी करण्यात आली.त्यावेळी तिथे आसपास हजारो कबरी आढळल्या. वयवर्षे ३ ते १६ वर्षांच्या बालकांचे मृतदेह या कबरीत आढळले. या कबरीतील ४,११३ बालकांची ओळख पटली. हजारो बालकं अशी मृत्युमुखी कशी पडली? यासाठी ट्रुथ अॅण्ड रिक्नसलियेशन’समितीने या वसतिगृहाशी संबंधित असलेल्या सहा हजार लोकांच्या साक्षी नोंदवल्या. ५ २०१साली समितीने अहवाल प्रकाशित केला. त्यात निष्कर्ष होते की, वनवासी समाजातील मुलांना या वसतिगृहात शिकणे बंधनकारक होते. तीन वर्षांच्या मुलांना इथे आई-बाबांपासून दूर आणण्याचा हेतू होता तरी काय? तर या मुलांनी आपली संस्कृती विसरावी हाच हेतू होता. आपला मूळ धर्म-संस्कार सोडून या मुलांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारावा, यासाठी ही वसतिगृहं होती. वसतिगृहात केवळ मुलांना ख्रिस्ती धर्माच्या प्रार्थना शिकवल्या गेल्या. वसतिगृहात मुलांना त्यांची भाषा बोलण्यास बंदी होती.
चुकून कोणी त्यांच्या मातृभाषेत बोललाच तर त्याच्या जिभेला सुई टोचणे, तोंडात मसाला भरणे वगैरे शिक्षा केली जाई. इथे मुलांकडून केवळ गुलामगिरी करून घेण्यात येई. मुलांवर मानसिक आणि लैंगिक अत्याचार करण्यात येत. मुलांना अत्यंत कमी अन्न दिले जाई. त्यामुळे कुपोषण, क्षयरोग, साथीच्या आजारांनी मुलांचे निधन होई. बालकांच्या मृतदेहाची विल्हेवाट किड्यामुंग्यासारखी लावली जाई. निष्पाप बालकांच्या दुर्दैवी मृत्यूबद्दल कुठेही नोंद नव्हती. २०१५ सालाच्या अहवालानंतर पुन्हा २०२१ साली अशाच एका बंद पडलेल्या वसतिगृहाच्या जागेत २१५ कबरी सापडल्या. ख्रिस्ती संस्कृती आणि धर्मप्रसारणासाठी वनवासी बालकांचा जीव घेण्यात आला, असे म्हणत सगळे जग हळहळले. दि. २१ मे ‘जागतिक सांस्कृतिक विविधता दिवसा’निमित्त तरी जगभरातले दहशतवादी, धर्मांतर मतांतर घडवून आणणारे धर्मांध माणसाला जगणे शिकवतो तो धर्म हे समजतील का? कॅनडातील वनवासींनी चर्चसंस्थेला माफी मागायला सांगितली आहे, चर्चसंस्था माफी मागेल का?चर्चसंस्था माफी मागेल का?