वाराणसी : ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाच्या तिसऱ्या दिवशी शिवलिंग सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. हिंदू पक्षाकडून हा दावा करण्यात आला असून मुस्लिम पक्षाकडून हा दावा नाकारण्यात आला आहे. आता या सर्वेक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले गेले असून मंगळवारी या याचिकेवर सुनावणी होणार आहे. मशिदीच्या बाजूला असलेल्या विहिरीत हे शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षाचे वकील विष्णू जैन यांनी हे शिवलिंग सापडल्याचा दावा केला आहे. ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाचा अहवाल उद्या न्यायालयात सादर होणार आहे.
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाचा सोमवारी अखेरचा दिवस आहे. या सर्वेक्षणात मशिदीच्या आवाराबरोबर बाजूला असलेल्या विहिरीचेही सर्वेक्षण करण्यात आले आहे. याचवेळी सर्वेक्षणात या विहिरीत शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षाकडून केला जात आहे. या परिसराला संरक्षण देण्यात यावे अशी मागणी हिंदू पक्षाकडून केली जात आहे. आता या प्रकरणाला संपूर्ण वेगळे वळण लागले असून पुढे न्यायालय काय निकाल देणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.