नवी दिल्ली : ज्ञानवापी मशिदीच्या बाबतीत महाराष्ट्र काँग्रेस सेवादलाचा खोटेपणा उघड झाला आहे. मुस्लिम आक्रमकांच्या बाजूने सेवादलाने काही दावे केले होते पण हेच दावे खोटे आहेत हे उघड झाले आहे, ज्ञानवापी मशिदीच्या एका भिंतीचे भारतीय पुरातत्व खात्याच्या संग्रहातील छायाचित्र ट्विटर टाकले गेले होते. या छायाचित्राच्या खाली ही भिंत पूर्वी औरंगजेबाने पाडलेल्या काशी विश्वनाथ मंदिराचा भाग होती असा दावा केला होता. हे छायाचित्र १८९० साली घेतले होते. यावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र काँग्रेस सेवादलाने दावा केला होता की १७०७ साली औरंगजेबाचे निधन झाले मग एवढ्या वर्षांपूर्वी गेलेल्या माणसाचा १८९० सालच्या छायाचित्रही काय संबंध? असा सवाल काँग्रेस सेवादलाच्या वतीने केला गेला होता.
मूळ छायाचित्र १८३४चे
इंडियन हिस्टरी पिक्सने आपल्या ट्विटवर मूळ छायाचित्र पोस्ट करत काँग्रेसच्या दाव्यातील खोटेपणा उघड केला. हे मूळ छायाचित्र ब्रिटिश लिब्ररीमधले असून जेम्स प्रिन्सेप्स या आशियाटिक सोसायटी ऑफ बंगालच्या संस्थापक संपादकाने काढलेले असून त्यात त्याने स्पष्टपणे ही भिंत काशीविश्वनाथ मंदिराची असून टी आता मशिदीचा भाग झाली आहे असे स्पष्टपणे म्हटले आहे. यातून औरंगजेब बादशहाने जे काशीविश्वेश्वराचे जे देवालय पाडले त्याच्याच अवशेषांवर ही मशीद उभी राहिली आहे या दाव्याला बाळ प्राप्त होते. महाराष्ट्र काँग्रेस सेवादलाच्या मुस्लिम आक्रमकांच्या बचावाचा प्रयत्न फोल ठरला आहे.
सध्याच्या मंदिरांच्या निर्मात्या अहिल्याबाई होळकर
औरंगजेब बाद्शहाने काशी विश्वनाथाचे मंदिर उध्वस्त केल्यावर त्याठिकाणी कुठलेच मंदिर अस्तित्वात नव्हते. मराठेशाहीतील सर्वात कर्तृत्ववान महिलांपैकी असणाऱ्या , इंदूरच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी या सध्याच्या देवालयाची १७८०मध्ये स्थापना केली. हे नवे मंदिर ज्ञानवापी मशिदीला लागूनच स्थित आहे आणि याच मंदिराच्या समोरचा नंदी हा मशिदीकडे तोंड करून उभा आहे, याच सर्व मुद्द्यांवरून आता प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत.