मध्यप्रदेशात खासगी शाळेतील छुप्या धर्मांतराचा प्रकार उघड

    16-May-2022
Total Views |
 
bhopal
 
 
 
 
 
 
भोपाळ : बैरागढ भागातील ख्राईस्ट मेमोरियल स्कूल मध्ये लोकांची माथी भडकावून लोकांचे छुप्या पद्धतीने धर्मांतर केले जात असल्याची घटना पोलिसांनी उघड केली आहे. या शाळेत हिंदू देव - देवतांबद्दल द्वेष पसरवणारी भाषणे करून लोकांची माथी भडकावून त्यांना धर्मांतरासाठी प्रोत्साहित केले जात होते. या शाळेत अशा पद्धतीने काही संशयास्पद घटना सुरु आहेत अशी माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी शाळेवर छापा मारून दोषींना अटक केली आहे. ही घटना भाजपचे स्थानिक आमदार रामेश्वर शर्मा यांच्या प्रयत्नांनी उघडकीस आली आहे.
 
 
 
 
शाळेचे संचालक मेनीस मॅथ्यूज आणि पाल पोलूस यांच्यासह ५ जणांना अटक करण्यात आली आहे. शाळेत येणाऱ्या मुलांवर तसेच त्यांच्या पालकांवर त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत ख्रिस्ती चमत्कारांचा प्रभाव टाकून त्यांना ख्रिस्ती धर्मात प्रवेश करण्यासाठी प्रोत्साहित करणे हेच या लोकांचे काम होते. त्यासाठी हिंदूंच्या सर्व पवित्र प्रतिकांवर चिखलफेक करण्याचे काम पद्धतशीरपणे सुरु होते. अशा पद्धतीने लोकांची दिशाभूल करून त्यांना धर्मांतरासाठी प्रवृत्त करण्याचे प्रकार सातत्याने उघडकीस येत आहेत.