औरंगजेबाच्या कबरीच्या ठिकाणी अकबरुद्दीन ओवैसींची हजेरी

    12-May-2022
Total Views |
 
 
 
aurangzeb
 
 

औरंगाबाद : एमआयएमचे तेलंगणाचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी हे सध्या औरंगाबाद दौऱ्यायावर आहेत. गुरुवारी (दि. १२ मे) त्यांनी खुलदाबाद येथे असलेल्या औरंगजेबच्या कंबरीच्या ठिकाणी गेल्याचे उघड झाले आहे. यावेळी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलीलही उपस्थित होते. औरंगाबाद येथे एका शाळेच्या उदघाटनासाठी आल्याची माहिती यावेळी जलील यांनी दिली. "खुलदाबादमध्ये अनेक महापुरुषांच्या दर्गा आहेत. त्याचप्रमाणे औरंगजेबाचीही आहे. इथे कोणीही आलं तरी ते औरंगजेबाच्या कबरीला भेट द्यायला अवश्य जातात. त्यामुळे यातून वेगळा अर्थ काढायची काही गरज नाही.", असे इम्तियाज जलील यांनी म्हणणे आहे.  
  
 
 
दरम्यान अकबरुद्दीन ओवैसींनी घेतलेल्या कबरीला दिलेल्या भेटीमुळे मोठा गदारोळ उठला आहे. "ज्या औरंगजेबाने हिंदूंना अतोनात छळले, त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले; त्याच्या कबरीकडे कोणी फिरकतसुद्धा नसताना अकबरुद्दीन यांना तिथेच का जावेसे वाटले?" असा प्रश्न भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केला आहे. तर "हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे आणि त्याच महाराष्ट्रात येऊन तुम्ही औरंगजेबाच्या थडग्याला भेट देता; याने तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत!", अशी टीका विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.