नवी दिल्ली: "महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सद्बुद्धी मिळावी यासाठी १४ मे रोजी दिल्लीत हनुमानाची महाआरती करणार"असल्याचे नवनीत राणा यांनी जाहीर केले आहे. उद्धव ठाकरे यांची १४ मे रोजी सभा होणार आहे त्याच दिवशी सकाळी ९ वाजता या महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. "सुप्रीम कोर्टाने राजद्रोहाच्या कलमाबाबतीत दिलेल्या निर्णयाचे स्वागत करतो. असेही राणा यांनी सांगितले.
महाराष्ट्रात सध्या हिटलरशाही सुरु आहे, महाराष्ट्रात राजद्रोहाचा कलम लागू झालेली मी पहिली महिला आहे असा दावा नवनीत राणा यांनी केला आहे. आपल्या स्वतःच्या पैश्यातून खरेदी केलेल्या घरावर मुंबई महापालिकेकडून कारवाई केली गेली आहे. उद्धव ठाकरेंनी आपल्या १४ मेच्या सभेत आपण कुठल्या मतदारसंघातून लढणार आहोत ते जाहीर करावे मी त्यांच्याविरोधात लढायला तयार आहे असे आव्हानही नवनीत राणा यांनी दिले आहे.