नवी दिल्ली: अफगाणिस्तानमधील दहशतवादाचे चित्रीकरण करताना दहशतवाद्यांकडून हत्या झालेले रॉयटर्सचे पत्रकार दानिश सिद्दीकी यांना सोमवारी मरणोत्तर पुलित्झर पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार पत्रकारिता क्षेत्रातील सर्वात मानाचा पुरस्कार समाजाला जातो. कोरोना काळात त्यांनी केलेल्या छायाचित्रणाबद्दल हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. दानिश यांच्यासोबत अदनान अबिदी, सना इर्शाद मट्टू , अमित दवे या भारतीय पत्रकारांनाही हा पुरकर जाहीर झाला आहे.
आपल्या वास्तववादी छायाचित्रणासाठी दानिश सिद्दीकी प्रसिद्ध होते. अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या दहशतवादी कारवायांचे त्यांनी खूप प्रभावी चित्रण करून तेथील भीषण वास्तव जगासमोर आणले होते. अफगाणिस्तानातील कंधार परिसरात त्यांची दहशतवाद्यांकडून हत्या करण्यात आली होती. पुलित्झर पुरस्कारांच्या फीचर फोटोग्राफीसाठी दानिश यांना सन्मानित करण्यात आले आहे.