‘युएपीए’ कायद्यात दुरुस्ती!

विधेयक लोकसभेत एकमताने मंजूर

    07-Apr-2022
Total Views | 136
 
 
jyshnkr
 
 
नवी दिल्ली : ‘बेकायदेशीर कृत्यप्रतिबंधक कायदा (युएपीए) दुरुस्ती विधेयक, 2022’ लोकसभेत बुधवारी एकमताने मंजूर करण्यात आले. केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी बुधवारी हे विधेयक लोकसभेत मांडले. या विधेयकाद्वारे आंतरराष्ट्रीय जबाबदारीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात सामूहिक विनाशकारी शस्त्रे व त्यांच्या वितरण प्रणालीच्या प्रसारावर निर्बंध कठोर करण्यात येणार आहेत. हे विधेयक व्यक्तींना सामूहिक विनाशाची शस्त्रे आणि त्यांच्या वितरण प्रणालीशी संबंधित कोणत्याही प्रतिबंधित कृत्यांना वित्तपुरवठा करण्यास प्रतिबंधित करते. व्यक्तींना अशा कृत्यांना वित्तपुरवठा करण्यापासून रोखण्यासाठी, केंद्र सरकार त्यांचे निधी, आर्थिक मालमत्ता किंवा आर्थिक संसाधने गोठवू शकते, जप्त करू शकते. निषिद्ध असलेल्या कोणत्याही क्रियाकलापाच्या संबंधात इतर व्यक्तींच्या फायद्यासाठी वित्त किंवा संबंधित सेवा उपलब्ध करून देण्यासही ते प्रतिबंधित करू शकते.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121