मोहित भारतीय यांनी कुरिअरद्वारे सोलापूर येथे पाठवले 8 भोंगे

पावन मारुती मंदिरावरील त्या भोंग्यावर हनुमान चालीसाचे पठण

    28-Apr-2022
Total Views |
                                       
manache shlok                                              
 
सोलापूर : राज्यातील मशिदींवरील भोंगे येत्या दि. 3 मेपर्यंत नाही उतरवले, तर त्या समोरील मंदिरांवर भोंगे लावून त्यावरून हनुमान चालीसा लावण्यात येईल, असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता. मात्र, सोलापूरसाठी भाजपचे मुंबईतील नेते मोहित भारतीय यांनी कुरिअरद्वारे आठ भोंगे पाठवले आहेत. मंगळवारी जुनी पोलीस लाईन येथे पावन मारुती मंदिरावर यातील एक भोंगा लावून हनुमान चालीसाही म्हणण्यात आली.
 
त्यानंतर पोलिसांनी तेथे येऊन परवानगीची चौकशी केली. हे समजताच भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख तेथे दाखल झाले आणि हनुमान मंदिरात दर्शन घेतले. “भोंगा लावल्यानंतर पोलिसांकडून त्रास होण्याची शक्यता आहे. कोणाची तक्रार नसताना पोलिसांनी विनाकारण हनुमान भक्तांना त्रास दिल्यास आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
मोहित भारतीय यांनी, मागेल त्याला भोंगा देण्याची घोषणा केली.
 
सोलापुरातून मागणी झाली. त्यानुसार कुरिअरने आठ भोंगे आल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यापैकी रेल्वे लाईन परिसरात पावन मारुती मंदिरावर जुना भोंगा काढून मोहित यांनी पाठवलेला भोंगा लावून हनुमान चालीसा लावण्यात आली. पोलिसांना माहिती मिळताच परवानगीची मागणी करण्यात आली असता त्या भागातील कार्यकर्ते किरण पवार यांनी परवानगीसाठी अर्ज करू, असे सांगितले. शहरात मुंबईहून कुरिअरने भोंगा आल्याचे समजताच पोलिसांनी चौकशी सुरू केली. कोणत्या करियरने किती भोंगे आले, ते कोणाला वाटप करण्यात आले, याची माहिती पोलिस घेत आहेत.
 
सर्व प्रार्थनास्थळांवर भोंग्यासाठी परवानगी घ्या!
  
सर्व प्रार्थनास्थळांवर भोंगे लावण्यासाठी पोलिसांची परवानगी घ्यावी. नियमांचे, वेळेचे बंधन सर्वांनी पाळावे, अशा सूचना फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व प्रार्थनास्थळ प्रमुखांना करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक विकास देशमुख यांनी दिली. मंगळवारी एका मंदिरात हनुमान चालीसा भोंग्यांवरून लावण्यात आली. पोलिसांनी पाहणी करून नियमांचे पालन करण्याची सूचना देत भोंगा लावण्यासाठी सर्वांनी परवानगी घ्यावी, असे आवाहन केले.
 
आ. विजयकुमार देशमुखांचा आंदोलनाचा इशारा

“भोंगे लावल्यास पोलिसांकडून हनुमान भक्तांना त्रास होण्याची शक्यता आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार पोलीस हिंदूंना त्रास देत आहेत. नियमानुसार भोंगे लावत असताना हनुमान भक्तांना पोलीस ठाण्यात बोलावून भोंगा काढा, असे सांगण्यात येत आहे. इतर धार्मिकस्थळांवर भोंगे असताना कारवाई होत नाही. हिंदूंना त्रास दिल्यास भाजपकडून आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा आ विजयकुमार देशमुख यांनी दिला आहे.
 
औरंगाबादसाठी पुण्याहून 50 भोंगे
  
मशिदींवरील भोंगे न काढल्यास त्यांच्यासमोर भोंगे लावून हनुमान चालीसा लावण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) राज ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करण्यासाठी मनसेच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी भोंग्यांची खरेदी सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात मशिदींसमोरच्या मंदिरांतच भोंगे वाजवण्याचे नियोजन आहे. यासाठी बॅटरीवर चालणार्‍या अत्याधुनिक भोंग्यांची खरेदी सुरू असून औरंगाबादमध्ये 50 भोंगे दाखल झाले आहेत. औरंगाबादेतील पदाधिकार्‍यांनी 1,500 ते 1,800 रुपये दराने पुण्यातून 50-55 भोंग्यांची खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. “आम्ही स्थानिक पातळीवर भोंग्यांची खरेदी सुरू केली आहे. दि. 3 मे रोजी मशिदींवरील भोंगे बंद नाही झाले, तर कोणत्याही परिस्थितीत आमचे भोंगे जोरातच वाजतील,” असा इशारा मनसेचे औरंगाबाद शहराध्यक्ष आशिष सुरडकर यांनी दिला आहे.