ठाणे खाडीवरील ‘टीसीबी-३’ या पुलाच्या बांधणीमुळे मासेमारीला फटका बसत असल्याचे व नुकसानभरपाई मिळावी, असे मच्छीमारांचे म्हणणे होते. पण, सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच मच्छीमारांना नुकसानभरपाई देण्यावर स्थगिती आणली. त्या पार्श्वभूमीवर जाणून घेऊया, ठाणे खाडीवरील ‘टीसीबी-३’ पुलाच्या सद्यःस्थितीतील बांधकामाबाबत...
१९५९ मध्ये एसजी बर्वे बृहन्मुंबईतील वाहतूक समस्या दूर करण्यासाठी अभ्यास समितीचे प्रमुख होते व त्यांनी ठाणे खाडीवर रेल कम रोड ब्रिजचे काम सुचविले होते. त्यातून औद्योगिक व मुंबईचा वाढता विकास साधण्यासाठी या पुलासंबंधी विचार झाला व ठाणे खाडीवर पूर्व-पश्चिम असा दोन मार्गिकेचा पूल बांधायचे ठरले. मुंबई व नवी मुंबई यांना हद्दीवर जोडणारी ठाणे खाडी आहे व त्यावरून हा पहिला पूल (टीसीबी-1) बांधला गेला तो १९७३ मध्ये. या पुलाचा वापर खूप झाला व मुंबईतील प्रवासी व वाहनांच्या वाहतुकीला नवी मुंबईत जाण्याकरिता एक मार्ग मिळाला व या पुलामुळे नवी मुंबईचा विकास वाढला. दुर्दैवाने हा पहिला ठाणे खाडीवरील पूल वाहतुकीला अपुरा ठरु लागला. कारण, त्याची वारंवार दुरुस्ती करायला लागत होती. त्यामुळे वाशीहून मानखुर्दला जाण्याकरिता १९८७ मध्ये दुसरा पूल ’टीसीबी-२’ बांधला गेला व वाहतुकीकरिता तो 1997 मध्ये खुला झाला. हा पूल जाण्यायेण्याच्या वर्दळीकरिता ३ + ३मार्गिकांचा बांधला गेला. दुर्दैवाने हा पूलही वाहतुकीला कमी पडायला लागल्यामुळे सरकारने तिसर्या पुलाचा ‘टीसीबी-3’ प्रस्ताव आणला असून त्याचे काम ऑक्टोबर २०२० पासून सुरू आहे. हा पूल दोन भागात आहे व सध्याच्या ‘टीसीबी-२’ च्या दोन्ही बाजूंकडे बांधला जात आहे. शिवडीच्या पारबंदर खाडीवरील सध्या बांधकाम सुरु असलेल्या पूल २१.८ किमी लांबीचा आहे. पण, ‘टीसीबी-३’ पूल फक्त १.८ किमी लांबीचा असून बांधकामाकरिता फार जोखमीचा व आव्हानात्मक असा असणार आहे.
‘टीसीबी-३’ पुलाच्या संरचनेची वबांधकामाची थोडक्यात माहिती
‘टीसीबी-३’ पुलाचे बांधकाम ‘एमएसआरडीसी’ कंपनीकडून केले जात आहे. या पूल-प्रकल्पाला प्रशासकीय मंजुरी दि. २४ नोव्हेंबर, २०१७ रोजी मिळाली व बांधकामाकरिता कंत्राटदार लार्सन अॅण्ड टुब्रो यांना रु. ५५९ कोटींचे ३६ महिन्यांचे काम दि.२९ ऑक्टोबर,२०२० रोजी देण्यात आले. काम संपविण्याची वेळ दि. २८ ऑक्टोबर, २०२३ अशी ठरली आहे. त्यानंतर हमीचा कालखंड (वशषशलींर्ळींश रिूाशपीं शिीळेव) ४८ महिन्यांचा आहे. आजच्या दिवसाला फक्त १५ टक्के काम संपले आहे. हे काम कमी वेगाने चालू राहण्याचे कारण कोरोना काळ व दुसरे कारण याचे बांधकाम फार आव्हानात्मक असल्याने वेगाने करणे कठीण जाते. या पुलाच्या प्रकल्प कामावर सुमारे ६०० हून अधिक कामगार व अभियंते २४ तास काम करीत आहेत. या प्रकल्पाचे आयुर्मान अंदाजे १०० वर्षे. या पुलाची लांबी १.८३७ + १.२५ अॅप्रोच रस्ते व टोल प्लाझा = ३.०८७किमी.
हा पूल म्हणजे जुन्या ‘टीसीबी-१’ व २ पुलांचा विस्तार आहे. या पुलाचा एक भाग ‘टीसीबी-२’पुलाच्या मोकळ्या बाजूला असणार आहे व तो तीन मार्गिकांचा असणार आहे. दुसरा भाग ‘टीसीबी-१’ व ‘टीसीबी-२’ च्यामधील २२ मीटर जागेत तीन मार्गिकांचा बांधला जाणार आहे. त्यामुळे विस्तारपूर्वक ‘टीसीबी-३’ पुलाला एकूण मार्गिका ६ + ६ येण्याजाण्याच्या वर्दळीसाठी राहणार आहेत.
या पुलाच्या बांधकामात ठाणे खाडीचे उथळ पाणी व्यत्यय आणत आहे व तळचे पाणी दलदलीचे आहे व या खाडीत भरती-ओहोटीच्या लाटांचा मारा होत असतो. हा ‘टीसीबी-३’ पुलाचा भाग सध्याच्या ‘टीसीबी-१’ व २ पुलाजवळ बांधला जाणार असल्याने जुन्या पुलांच्या पायथ्यांचा पाया जपायला हवा. नवीन पुलाचे काम करणे जोखमीचे व ते जुन्या पुलांच्या पायथ्यांना धक्का लागणार नाही, अशा जोखमीने व सांभाळून करायला हवे.
सरकारच्या म्हणण्याप्रमाणे वाशीहून ठाणे खाडीपर्यंत येणारी व मुंबईहून ठाणे खाडीपर्यंत येणारी वाहने कमीतकमी दहा मार्गिकांचा उपयोग करतात. ‘टीसीबी-२’ पुलाला फक्त ३ + ३ मार्गिका मिळतात, म्हणजेच या पुलावर पुढे वाहनांना जाणे अडचणीचे होते. पण, सध्याच्या पुलामुळे वाहतुकीला खोळंबा होतो. म्हणून नवा प्रकल्प हा मदतीला बांधला जात आहे व तो ६ + ६ मार्गिकांचा राहणार आहे. पाण्यातील कामे असल्याने मँन्ग्रोव्हज, इतर बाबी व मासेमारीकरिता विशिष्ट ‘ऑथोरिटी’कडून वेगळ्या सुमारे डझनभर मंजुर्या मिळवाव्या लागतात.
पुलावरील आव्हानात्मक कामे
ठाणे खाडीच्या पाण्यातील पुलाची संरचना व बांधकाम आव्हानात्मक राहणार. कारण, जुन्या पुलांच्या जागेच्या मर्यादा पडणार असल्याने त्या अडचणी आणू शकतात. शिवाय उथळ पाणी व भरतीच्या अडचणी बांधकामात येऊ शकतात. सगळ्यात जास्त आव्हानात्मक काम म्हणजे जड व मोठाली यंत्रे उथळ पाण्यामध्ये हालचाली करण्यासाठी फार कठीण जाते. जुन्या पुलावर २४ तास वाहतूक सुरू असते व त्यांच्या पायाला धक्का लागता कामा नये. काम करणारे अभियंते म्हणतात की, “मोकळ्या समुद्रावर उथळ वा खोल पाण्यात काम करणे त्यामानाने सोपे असते. पण जुन्या पुलांचा पाया असले की खूप अडचणी येऊ शकतात. जुन्या ‘टीसीबी-१’ व २ पुलांमध्ये २२ मीटर जागेत नवीन पुलांच्या पायाचे काम करणे फार जिकिरीचे ठरते. कारण, पाण्याच्या तळाशी खणणे व भोके पाडणे, खांबांकरिता पाईलचे काम करणे, पिलरवरती १३ मीटर रुंदीचा डेक वा पूल बांधणे इत्यादी फार अवघड ठरते. या २२ मीटर जागेमध्ये कामाकरिता जड यंत्रे मोकळेपणी हलविणे अगदी अडचणीचे ठरते. भरती-ओहोटीच्या वेळा आम्हाला माहिती करून घ्याव्या लागतात. ओहोटीचा जोर एवढा असतो की, टग बोट वा जॅक बार्जेस त्यात सापडले, तर अशा चुकीमुळे यंत्रे संकटात जाऊन बिघडू शकतात. भरती-ओहोटीच्या वेळापत्रकाप्रमाणे कामे करण्यासाठी ती कामे दोन ते चार तासात पार पाडावी लागतात.”
नवीन पूल ‘टीसीबी-३’ हा विस्ताराचा असल्याने त्याची उंची, रुंदी व लांबी जुन्या पुलाइतकीच असेल, अशी काळजी घ्यावी लागते. असे जरी असले तरी नवीन पुलाचे फाऊंडेशन कंत्राटदारांनी वेगळ्या प्रकारचे ठेवले आहे. ‘टीसीबी-२’ पुलाला विहीर पुलाचे बंधार्याचे फाऊंडेशन बांधलेले आहे. पण नवीन पुलाकरिता ‘पाईल फाऊंडेशन’ वापरले जाणार आहे व त्याकरिता बोअरिंग मशीनने खाडीच्या तळाशी भोके पाडली जाणार आहेत व त्यानंतर त्यात लोखंडी पाईप घालायचा असतो व त्यात पोलादी सळ्या व काँक्रिट टाकतात, असे सब स्ट्रक्चर बांधल्यानंतर त्यावर पुलाच्या प्लॅटफॉर्मकरिता सुपरस्ट्रक्चर बांधतात.
उथळ पाण्यातील स्ट्रक्चरकरिता दोन पर्याय आहेत. एक म्हणजे दुसर्या यार्डात तयार केलेले ’प्रिकास्ट स्ट्रक्चर’ आणणे. परंतु, जागेच्या २२ मीटरच्या मर्यादांमुळे ‘प्रिकास्ट स्ट्रक्चर’ योग्य ठरत नाही वा दुसरे म्हणजे घरांच्या स्लॅबसारखे सितु काँक्रिट वापरणे. या कामाला दुसरा पर्याय योग्य ठरत आहे.पाण्यामध्ये काम करण्यात कुशल असणार्या डायव्हर व मरीन एक्सपर्ट इत्यादी २४ जणांची मरीन कामावर नजर ठेवण्यासाठी मरीन सुपरवायझरची खास नेमणूक केलेली आहे.
कामावरची यंत्रे, मशीनरी व बार्जेस सुखरुप विनासंकट राहण्यासाठी हे सुपरवायझर भरती-ओहोटीकडे नजर ठेवून असतात. प्रत्येक ठिकाणी व वेगवेगळ्या दिवशी भरती-ओहोटीचा जोर वेगवेगळा असू शकतो. या सुपरवायझर्सच्या सल्ल्याने मशिनरी हलविली जाते व दोन ते चार तास काम करायला मिळतात, तेवढ्या वेळात कामे आटोपून घ्यावी लागतात. त्या विशिष्ट वेळात मशिनरी हलविली नाही, तर जुन्या पुलांच्या फाऊंडेशनला धक्का लागू शकतो. हे टाळण्यासाठी सुपरवायझरची आवश्यकता भासते. भरती-ओहोटीमुळे मशिनरीची वेळ त्यानुसार ठेवावी लागते. अशा तर्हेने कामे फार संवेदनशीलतेने करावी लागतात. एका सुपरवायझरने सांगितले की, रेल्वे पुलाजवळ ४५०० व्होल्टच्या ‘इलेक्ट्रिक’ केबल सांभाळाव्या लागणार आहेत.
ही मशिनरी व यंत्रे खाडीच्या पाण्यात पार्क करणे अडचणीचे ठरते. वेगळ्या प्रकारचे बार्जेस, टग बोट व इतर यंत्रे व मशिनरी २५ हून जास्ती आहेत, ती नेहमी योग्य ठिकाणी काम झाल्यावर पार्क करावी लागतात. पावसाळ्यात मात्र कामे करणे मुश्किल होऊन बसते. पाण्याचा जोराचा प्रवाह व मोठा वारा नेहमीची कामे अगदी मोठ्या संकटात टाकू शकतात.
कामाची सद्यःस्थिती काय आहे?
२०२० मध्ये सुरू केलेले बांधकाम आजपर्यंत फक्त १५-२० टक्केच झाले आहे. ’कोविड’मुळे अडचण आली व दुसरे म्हणजे कामाची जोखमीची कामे करण्यास फार वेळ जातो. पाईल फाऊंडेशनची कामे ५० टक्क्यांपर्यंत पुरी झाली आहेत. ही सर्व कामे आव्हानात्मक व उद्बोधक अशीच आहेत व सतत २४ तास कामे सुरू आहेत.