मुंबई: किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी किरीट सोमय्या यांच्यासह मंगलप्रभात लोढा, प्रवीण दरेकर आणि ८ वकिलांचे शिष्टमंडळ हे राज्यपालांची भेट घेणार आहेत. "शिवसेनेच्या गुंडांना संजय पांडे यांच्याकडून संरक्षण मिळत आहे" असा थेट आरोप सोमय्या यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना केला.
मुंबई पोलीस आयुक्त हे माफियागिरी करत असल्याचा आरोपसुद्धा त्यांनी केला. आपल्यावर खार पोलिस स्टेशनच्या बाहेर आपल्यावर जो जीवघेणा हल्ला झाला त्यावेळी त्या गुंडाना पोलीससुद्धा सामील होते, त्यांच्यावर अजून कारवाई का झालेली नाही? असा सवाल सुद्धा त्यांनी केला.
ज्या एफआयआर वर आपण कधीच सही केली नव्हती, त्या नकली एफआयआरवरून खार पोलिसांनी आपल्यावर कारवाई सुरु केली. या सर्व प्रकाराबद्दल आम्ही केंद्रीय गृहसचिवांना सांगितले आहे. तसेच याबद्दल आपण राज्यपालांना भेटून माहिती देणार आहोत असेही सोमय्या यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना येऊन सांगितले.