अंबरनाथ (प्रतिनिधी): राष्ट्रवादीचे आ. अमोल मिटकरी यांच्या निषेधार्थ रविवारी अंबरनाथला अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्यावतीने घोषणाबाजी करून निदर्शने करण्यात आली. आ. मिटकरी यांनी ब्राह्मण समाज आणि हिंदू विवाह पद्धतीमधील कन्यादान संस्कार पद्धतीवर गलिच्छ शब्दांत टीका केल्याच्या निषेधार्थ वडवली विभागातील ब्राह्मण सभेच्या कार्यालयासमोर ही निदर्शने करण्यात आली. यावेळी शिवाजीनगर पोलिसांना महासंघाच्यावतीने निवेदन देऊन समाजात तेढ निर्माण करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी श्रीकांत कर्वे, अप्पा कुलकर्णी, विजय खरे, वृंदा पटवर्धन, पराग वेलणकर, मंगला कुलकर्णी, पांडुरंग रानडे आदी उपस्थित होते.