मुंबई : "मुख्यमंत्र्यांनी पाठवलेले शिवसैनिक हे बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नाहीत. त्याचे शिवसैनिक असते, तर त्यांनी आम्हाला नक्कीच हनुमान चालिसा म्हणण्यासाठी समर्थन दिलं असतं. मात्र आज मुख्यमंत्री सत्तेचा दुरुपयोग करतायत.", असे मत भाजप आमदार रवी राणा यांनी व्यक्त केले. शनिवारी (दि. २३ एप्रिल) मातोश्री येथे जात असता पोलिसांकडून त्यांना दारतच अडवण्यात आले. त्यावेळी ते मध्यमांशी बोलत होते.
रवी राणा म्हणाले की, "हनुमान चालिसेचं पठण करण्यासाठी आम्ही शांततापूर्वक पद्धतीने मातोश्रीवर जाणार होतो. मात्र पोलिसांकडून आम्हाला दारतच अडवण्यात आले. यावरून मुख्यमंत्री राज्याची कायदा-सुव्यवस्था बिघडवत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यांनी पाठवलेले शिवसैनिक हे बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नाहीत. त्याचे शिवसैनिक असते, तर त्यांनी आम्हाला नक्कीच हनुमान चालिसा म्हणण्यासाठी समर्थन दिलं असतं. मात्र आज मुख्यमंत्री सत्तेचा दुरुपयोग करतायत. त्यांचे शिवसैनिक गुंडगिरी करत घरात घुसून मारण्याचा प्रयत्न करतायत. ज्या बाळासाहेबांचे विचार मातोश्रीत आजही आहेत. त्याच मातोश्रीमधून शिवसैनिकांना बोलवून आमच्यावर हल्ला करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांकडून दिले जात आहेत. हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे."