नवी दिल्ली: रामनवमी उत्सवानिमित्त जेएनयू मध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमावर डाव्या संघटनांकडून झालेल्या हल्ल्याच्या घटनेवर शिक्षण मंत्रालयाने जेएनयू प्रशासनाकडे सविस्तर अहवाल मागवला आहे. रामनवमीच्या दिवशी झालेल्या हिंसाचारात १६ विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती आहे. सोमवारी जेएनयू प्रशासनाने या बद्दल स्पष्टीकरण देताना विद्यापीठात कुठल्याही प्रकारचा धार्मिक हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही असे सांगितले आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने असा आरोप केला आहे की डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनांकडून रामनवमी निमित्त आयोजित होम-हवनावर हल्ला करण्यात आला. मुस्लिम धर्मियांचा पवित्र सण रमजान निमित्त आयोजित इफ्तार पार्टीवर हिंदू संघटनांकडून कधीच कुठलीही आडकाठी केली जात नाही तरीही या संघटनांकडून रामनवमी उत्सवावर हल्ला करण्यात आला. हा दुटप्पीपणा वारंवार होतो असाही आरोप अभाविपने केला आहे.