रामनवमी आणि ‘जेएनयु’मधील डाव्यांचा हिंदूद्वेष

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Apr-2022   
Total Views |
 
jnu
 
विद्यापीठामध्ये श्रीराम नवमी आणि इफ्तार हे दोन्ही शांततापूर्ण वातावरणात पार पडले जात असल्याचे डाव्या संघटनांना ते सहन न झाल्याने त्यांनी हा संघर्ष घडवून आणल्याचे सांगण्यात येते. ‘जेएनयु’मधील हा संघर्ष एक हजार एकर एवढ्या विस्तीर्ण क्षेत्रात पसरलेल्या या विद्यापीठाच्या कावेरी मेसपुरताच मर्यादित राहिला. श्रीराम नवमीच्या दिवशी हा संघर्ष विद्यापीठाच्या अन्य भागात पसरला नाही.
 
नवी दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये ‘हम करेसो कायदा’ अशी मानसिकता ठेवून त्या विद्यापीठातील डाव्या संघटना व डाव्या विचारांचे विद्यार्थी आणि त्यांचे समर्थक अध्यापक वागत आले आहेत. पण, अलीकडील काळात त्यांच्या मनमानीस आव्हान देताना राष्ट्रवादी विचारांचे विद्यार्थी आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसारख्या संघटना दिसत आहेत. डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनांना ‘जेएनयु’ म्हणजे आपलीच मक्तेदारी असलेले विद्यापीठ वाटत आले. देशद्रोही तत्त्वांची पाठराखण करण्यामध्ये त्या विद्यापीठातील डाव्या संघटना आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. काश्मीर प्रश्न असो, अफजल गुरूला फाशी देण्याचे प्रकरण असो, त्यावर ‘जेएनयु’मधील डाव्या संघटनांनी राष्ट्रविरोधी भूमिका घेतल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे हे विद्यापीठ म्हणजे राष्ट्रविरोधी डाव्या संघटनांचा अड्डा आहे की, काय, असा अनेकांचा समज झाला होता. अजूनही तो समज पूर्णपणे दूर झालेला नाही हेच श्रीराम नवमीच्या दिवशी या विद्यापीठात घडलेल्या हाणामारीवरून दिसून आले आहे.
 
श्रीराम नवमीच्या पवित्र दिवशी विद्यापीठामध्ये अभाविप या विद्यार्थी संघटनेच्या समर्थकांनी हवन, पूजा यांचे आयोजन केले होते. तसेच, या विद्यापीठातील भोजनगृहांमध्ये मांसाहारी पदार्थ न बनविता शाकाहारी पदार्थ बनवावेत, असे आवाहन करण्यात आले होते. श्रीराम नवमीच्या दिवशी रविवार असल्याने मांसाहारी पदार्थ हवेत, असा डाव्या संघटनेच्या विद्यार्थ्यांचा आग्रह होता. पण, श्रीराम नवमीच्या दिवशी आयोजित कार्यक्रम लक्षात घेऊन मांसाहाराचे सेवन न केल्याने काही आकाश कोसळणार नव्हते! अभाविप समर्थकांनी विद्यापीठात आयोजित पूजेला डाव्या संघटनेने आक्षेप घेतल्यानंतर संघर्षास प्रारंभ झाला. या संघर्षात काही विद्यार्थी जखमी झाले. श्रीराम नवमीचा कार्यक्रम कावेरी वसतिगृहाच्या मेसमध्ये योजण्यात आला होता. श्रीराम नवमीच्या दिवशी मांसाहारी पदार्थांचा पुरवठा करणार्‍या व्यक्तींना परत पाठविण्यात आले होते. डाव्या संघटनेच्या विद्यार्थ्यांना त्या दिवशी मांसाहाराचे सेवन करायचे होते त्यावरून संघर्ष उडाला. या संघर्षामध्ये अभाविपचे आणि डाव्या संघटनांचे कार्यकर्ते जखमी झाले. विद्यापीठामध्ये श्रीराम नवमी आणि इफ्तार हे दोन्ही शांततापूर्ण वातावरणात पार पडले जात असल्याचे डाव्या संघटनांना ते सहन न झाल्याने त्यांनी हा संघर्ष घडवून आणल्याचे सांगण्यात येते. ‘जेएनयु’मधील हा संघर्ष एक हजार एकर एवढ्या विस्तीर्ण क्षेत्रात पसरलेल्या या विद्यापीठाच्या कावेरी मेसपुरताच मर्यादित राहिला. श्रीराम नवमीच्या दिवशी हा संघर्ष विद्यापीठाच्या अन्य भागात पसरला नाही. जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये डाव्या संघटनांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तेथे पाय रोवून उभी राहत असल्याचे अशा घटनेवरून दिसून येत आहे. राष्ट्रविरोधी विचारांना सदैव विरोध करणार्‍या अभाविप या संघटनेमागे त्या विद्यापीठातील विद्यार्थी मोठ्या संख्येने नक्कीच उभे राहतील, असे गृहीत धरायला हरकत नाही.
मायावती राहुल गांधी यांच्यावर कडाडल्या!
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी जी वक्तव्ये करतात त्यातील अनेक वक्तव्यांसंदर्भात ते टीकेचे धनी होतात. मायावती यांच्या बसपाबद्दल बोलताना, अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी आपण बसपापुढे युतीचा प्रस्ताव मांडला होता. तसेच, मायावती यांना मुख्यमंत्री करण्यात येईल, असेही म्हटले होते. पण, त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात केले होते. राहुल गांधी यांचे हे वक्तव्य मायावती यांना समजताच त्या भलत्याच संतापल्या. काँग्रेसने आधी आपली काळजी करावी, असे त्यांनी राहुल गांधी यांना सुनावले. राहुल गांधी यांचे वक्तव्य हे बसपाची प्रतिमा मलीन करण्यासाठी केलेले वक्तव्य असल्याची टीकाही मायावती यांनी केली. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघास केवळ ‘काँग्रेसमुक्त भारत’ करायचा नसून ‘विरोधी पक्ष मुक्त’ भारत तयार करायचा आहे, असे त्या म्हणाल्या. ”राहुल गांधी यांच्यावर टीका करताना, आमचा पक्ष असा नाही की, ज्या पक्षाचा नेता संसदेत पंतप्रधानांच्या गळ्यात पडून मिठी मारतो. आमचा पक्ष असा नाही की, ज्या पक्षाची जगभर खिल्ली उडविली गेली,” असे त्या म्हणाल्या.
अलीकडेच उत्तर प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये बसपाला अवघी एक, तर काँग्रेस पक्षास अवघ्या दोन जागा मिळाल्या आहेत. बसपा नेते कांशीराम यांच्या कार्याचे कौतुक करताना, कांशीराम यांनी मागासवर्गीयांचा आवाज उठविला. पण मायावती यांनी आपण मागासवर्गीयांशी लढणार नाही, असे सांगितले आणि भाजपसाठी मार्ग प्रशस्त करून दिला. भाजपकडून सत्तेचा गैरवापर करून आपल्यामागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लावला जाईल, या भीतीपोटी त्यांनी अशी भूमिका घेतली असावी, अशी टीका राहुल गांधी यांनी मायावती यांच्यावर केली होती. निवडणुका झाल्यानंतर मायावती यांनी, आपला पक्ष हा भाजपची ‘बी टीम’ नसल्याचे स्पष्ट केले होते. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करताना मायावती यांनी, राहुल गांधी यांनी आधी आपले घर ठीकठाक करावे, असा सल्ला त्यांना दिला. राजीव गांधी यांनी बसपाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता आणि आता त्यांचे चिरंजीव तेच करीत आहेत, राजीव गांधी हे ‘सीआयए’चे हस्तक असल्याचा आरोप कांशीराम यांनी केला होता, हे मायावती यांनी काँग्रेस पक्षाच्या निदर्शनास आणून दिले. आपल्याकडे काँग्रेसने कोणताही प्रस्ताव मांडला नव्हता, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. २००७ ते २०१२ दरम्यान आपले सरकार असताना काँग्रेसने आपल्या सरकारच्या कामकाजात मोडता घातला होता, त्याचे स्मरणही मायावती यांनी काँग्रेस पक्षास करून दिले. उत्तर प्रदेशमधील निवडणुकीनंतर विरोधी पक्षांमध्ये पराभवाचे खापर दुसर्‍यावर फोडण्याची स्पर्धा चाललेली दिसून येत आहे. राहुल गांधी आणि मायावती यांनी परस्परांवर केलेली टीका हा तसलाच प्रकार असल्याचे दिसून येत आहे.
हाफिज सईदचा मुलगा दहशतवादी घोषित!
 
‘लष्कर-ए-तोयबा’ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या असलेल्या हाफिज मोहम्मद सईद याचा मुलगा हाफिज तलहा सईद यास भारत सरकारने कायदेबाह्य कारवाया प्रतिबंधक कायद्याखाली दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. दहशतवाद्यांची भरती करणे, अशा कारवायांसाठी पैसे गोळा करणे, ‘लष्कर-ए-तोयबा’च्यातर्फे भारतात आणि अफगाणिस्तानमध्ये भारताशी संबंधित आस्थापनांवर हल्ले करणे अशा विविध कारणांसाठी शुक्रवारी रात्री हाफिज तलहा सईद यास दहशतवादी घोषित करण्यात आले आहे. हाफिज सईदचा हा मुलगा ‘लष्कर- ए-तोयबा’चा वरिष्ठ नेता आहे. भारताने आतापर्यंत ज्यांना दहशतवादी घोषित केले आहे, त्यामध्ये हाफिजच्या मुलाचा 32वा क्रमांक आहे. या सूचीमध्ये हाफिज सईद,मौलाना मसूद अझर, दाऊद इब्राहिम यांच्यासह अन्य अनेक दहशतवाद्यांचा समावेश आहे. भारताने या सर्वांना दहशतवादी घोषित केले असले तरी ज्या देशात या अतिरेक्यांनी आश्रय घेतला आहे, त्यांच्या ‘आशीर्वादा’खाली या दहशतवाद्यांच्या भारतविरोधी कारवाया सुरूच आहेत.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@