नवी दिल्ली: "मुख्यमंत्री गेहलोत यांच्या राज्यात राजस्थानमध्ये तालिबानी शासन लागू झाले आहे. हिंदूंना त्यांचे सण- उत्सव साजरे करण्यापासून रोखले जात आहे, भीतीचे वातावरण तयार केले जाते आहे" असा आरोप राजस्थानमधील भाजप नेते सतीश पुनिया यांनी केला आहे. राजस्थानमधील पक्षाच्या मुख्यालयात आयोजित सभेत ते बोलत होते.
राज्यात गेल्या तीन वर्षांत धार्मिक हिंसेच्या ७ लाख गुन्ह्यांची नोंद झाली आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्येही वाढ झाली असून फक्त एका वर्षात महिला अत्याचारांच्या ६३३७ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. "करौली येथे येथे झालेल्या हिंचाराससुद्धा गेहलोत सरकारच जबाबदार आहे. ज्या पद्धतीने राजस्थान मध्ये तुष्टीतकरणाचे राजकारण सुरु आहे त्यावरून राजस्थान मध्ये तालिबानी शासन असल्यासारखे वाटत आहे." असा आरोप राजस्थान भाजपचे नेते सतीश पुनिया यांनी केला आहे.
"राजस्थानमध्ये परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत जाते आहे. धार्मिक तेढ वाढते आहे. आम्ही राजस्थान जळताना बघू शकत नाही अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी दिली आहे.