नवी दिल्ली : भारतीयांचे आराध्य दैवत भगवान श्रीराम यांचा जन्मोत्सव संपूर्ण देशभरात उत्साहाने साजरी होत आहे. रामनवमी निमित्त देशभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होत आहे. याच शुभ प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरद्वारे देशवासियांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. "आपल्या सर्वांवर भगवान श्रीरामांची कृपा राहो आणि त्यांच्या कृपेने सर्वांना त्यांच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी प्राप्त होवो" अशा शुभेच्छा पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना दिल्या आहेत.