नवी दिल्ली: भारतातील इलेकट्रीक वाहनांचा खप सातत्याने वाढतोच आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या खपात तिपटीने वाढ होऊन, १४८०० इलेकट्रीक वाहने विकली गेली. पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे हैराण झालेले ग्राहक मोठया वेगाने इलेकट्रीक वाहनांकडे वळत आहेत. जगातील प्रमुख वाहन निर्मिती कंपन्या असलेल्या टेस्ला, मर्सिडीज या कंपन्याही इलेकट्रीक वाहने भारतीय बाजारात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
इतर देशांच्या तुलनेत भारतीयांचे दरडोई उत्पन्न कमीच असल्याने हा इलेकट्रीक वाहनांच्या विक्रीतील मोठा अडथळा ठरतोय पण लवकरच यावर आपण मात करू असे भारतातील आघाडीचे उद्योजक गौतम अदानी यांनी सांगितले आहे. अदानी समूहाकडून भारतात इलेकट्रीक वाहनांची निर्मिती केली जात आहे.
२०७०साला भारताला शून्य कार्बन उत्सर्जन करणारा देश बनवण्याचे पंतप्रधान मोदी यांचे लक्ष्य आहे. या लक्ष्यपूर्ती साठी भारत सरकारने इलेकट्रीक वाहनांच्या निर्मितीला उत्तेजन देण्यासाठी विविध योजना आखण्यास सुरुवात केली आहे. या वाहनांसाठी लागणाऱ्या बॅटरीजसाठी आपण अजूनही चीनवर अवलंबून आहोत. आपले हे अवलंबित्व कमी करण्यासाठी भारत सरकारने इलेकट्रीक बॅटरी निर्मितीला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली आहे.