शिवसैनिकांनी आम्हाला गोळ्या घालायच्या बाकी ठेवल्या!

"द काश्मीर फाईल्स" पहायला जाणाऱ्या जोडप्याला शिवसैनिकांतर्फे मारहाण

    30-Mar-2022
Total Views |

jalgaon
 
 
 
जळगाव : 'द काश्मीर फाईल्स' चित्रपट पहायला आलेल्या एका दाम्पत्याला समाजमाध्यमावर कथित पोस्ट टाकल्याबद्दल शिवसैनिकांकडून बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. हेमंत दुतीया आणि गौरी दुतीया, असे या दाम्पत्याचे नाव आहे. हेमंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आहे, असा आरोप त्यांच्यावर होता. त्यांच्या कुटुंबासमोरच त्यांना बेदम मारहाण करण्यात आली.
 
 
"ज्या पोस्ट बद्दल आम्हांला मारहाण झाली ती पोस्ट आम्ही शेअर केलीच नव्हती. जसे त्या काश्मीर फाइल्स चित्रपटात दाखवले आहे तसाच भास मला होत होता जसे की आतंकवादीच मला घेरून उभे आहेत असे मला वाटत होते" अशी संतप्त प्रतिक्रिया गौरी दुतीया यांनी दिली आहे. महाविकास आघाडीच्या राज्यात मुख्यमंत्र्यांचा पक्ष शिवसेना अशी दहशत पसरवण्याचे काम करत असे तर इतर सामान्य नागरिक सुरक्षित आहेत का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो आहे.