औरंगाबाद : "राजकारणात शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांची कृपा झाली तर त्या व्यक्तीचं भाग्य उजळतं. २०१९ मध्ये झालेल्या नवडणुकीत मला खासदार करण्यात त्यांचा मोठा वाट होता. ते औरंगाबादचे किंगमेकर आहेत.", असा गौप्यस्फोट एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी शनिवारी (दि. २६ मार्च) केला. औरंगाबाद मधील वैजापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. विशेष म्हणजे शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांच्यासह अनेक नेतेमंडळी यावेळी कार्यक्रमास उपस्थित होते. इम्तियाज जलील यांनी काही दिवसांपूर्वी मविआ मध्ये येण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेला ऑफर दिली होती. त्यामुळे राजकीय वातावरणात अनेक आरोप प्रत्यारोप झाले होते.