रा. स्व. संघ : ‘स्व’पासून ‘स्वराज’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’

    24-Mar-2022
Total Views |

RSS
 
 
भारताच्या वेगाने वाढणार्‍या लोकसंख्येमुळे, कोणत्याही सरकारसाठी समान संख्येने नोकर्‍या निर्माण करणे अशक्य आहे. केवळ नोकरी शोधणारे न राहता आवश्यक ज्ञान आणि कौशल्य असलेले अधिकाधिक उद्योजक विकसित करण्यावर म्हणूनच भर दिला पाहिजे. या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपले प्रयत्न केंद्रित करत आहे.
 
 
 
१९२५ साली स्थापनेपासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वामी विवेकानंदांच्या तत्त्वांचे अगदी काटेकोरपणे पालन केले. स्वामी विवेकानंदांचा दृष्टिकोन, राष्ट्राचे वैभव पुनर्संचयित करण्याचा होता आणि त्यांनी आपल्या तरुणांमध्ये भारतातील स्वावलंबनावर विश्वास निर्माण करण्यासाठी मजबूत सांस्कृतिक आणि धार्मिक पाया असलेल्या अनेक पैलूंवर प्रकर्षाने जोरही दिला. संघ केवळ भारतीयांच्या स्वावलंबनावर विश्वास ठेवत नाही, तर संघ जमिनीवर तरुणांसोबत त्यासाठी काम करत आहे, उद्योगपतींना प्रोत्साहन देत आहे आणि आपल्या देशाच्या ‘आत्मनिर्भरते’वर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी सरकार सोबत संघही ठामपणे उभा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्वोच्च नेतृत्व आणि पदाधिकार्‍यांनी दि. ११ ते १३ मार्च रोजी त्यांच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेमध्ये स्वावलंबी भारतावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि कार्य करण्यासाठी एक ठराव मंजूर केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बहुआयामी दृष्टिकोन दरवर्षी एक लाखांहून अधिक तरुणांना आकर्षित करत आहे.
 
 
  
भारताच्या विकासासाठी ‘आत्मनिर्भरता’ का आवश्यक आहे?
यासाठी सर्वप्रथम काही बाबी व्यापक स्तरावर समजून घेऊया. प्रदीर्घ काळ आपल्याला मुघलांनी आणि नंतर इंग्रजांनी आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या उद्ध्वस्त केले. स्वातंत्र्यानंतरही आपण उत्पादन आणि सेवांच्या बाबतीत चीन आणि इतर विकसित देशांशी स्पर्धा करू शकत नाही, असे मानण्यासाठी अगदी पद्धतशीरपणे भारतीयांना ‘ब्रेनवॉश’ केले गेले. हळूहळू आपल्याला चिनी वस्तूंचे जणू व्यसनच जडले. चीनमध्ये तयार झालेल्या किती वस्तू आपण वापरतो, हे पाहण्यासाठी तुमच्या घराभोवती एक नजर फिरवा. आम्ही चीनकडून देवांच्या मूर्ती आणि पूजेचे साहित्यसुद्धा खरेदी करू लागलो. अशी मानसिक गुलामगिरी आणि इतर गरजांसाठी चीनवर अवलंबित्व धोकादायक होते, आहे आणि भविष्यातही असेल, हे वेगळे सांगायला नको. कारण, हा असा देश आहे, ज्याने नेहमीच भारताचा विश्वासघात केला, भारतीय नागरिक आणि सैनिकांवर हल्ले करण्याच्या कटकारस्थानात आपल्या शत्रू देशाचे पाकिस्तानचे चीनने नेहमी समर्थन केले. हाच दहशतवाद पोसणारा चीन भारतात नक्षलवाद निर्माण करतो आणि त्याला पाठिंबाही देतो. एवढेच नाही तर चीन जागतिक स्तरावर कधीही भारताचे समर्थन करत नाही, परंतु, विरोध करतो. चीन अजूनही ईशान्य भारत आणि जम्मू-काश्मीरचा भाग हा भारताचा भाग आहे, असे मानत नाही. तरीसुद्धा, आपल्या आधीच्या सरकारांच्या कृपेमुळे, त्यांनी पारीत केलेल्या कायद्यांमुळे आणि एकूणच चीनपूरक संरचनेमुळे अधिक कठीण परिस्थिती निर्माण झाली आणि अनेक व्यावसायिक-उद्योजक ज्यांना उत्पादन किंवा सेवा उद्योग सुरू करायचा होता, त्यांचा अक्षरशः मानसिक छळ झाला. चीनच्या तुलनेत आपली अर्थव्यवस्था खूपच कमकुवत ठेवण्यात आली. आपले अनेक उद्योजक टाटा, अंबानी, अझीझ प्रेमजी, महिंद्रा आणि इतर अनेक दिग्गजांच्या लवचिकता आणि चिकाटीबद्दल म्हणूनच मनस्वी धन्यवाद, ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही भारतीयांच्या मनात आपल्या क्षमतेबद्दल अभिमान आणि आत्मविश्वास जागृत केला.
 
 

Nanaji-Deshmukh 
 
 
 
पण, हे ध्यानात घेताना इथे अधोरेखित केले पाहिजे की, भारताच्या वेगाने वाढणार्‍या लोकसंख्येमुळे, कोणत्याही सरकारसाठी समान संख्येने नोकर्‍या निर्माण करणे अशक्य आहे. केवळ नोकरी शोधणारे न राहता आवश्यक ज्ञान आणि कौशल्य असलेले अधिकाधिक उद्योजक विकसित करण्यावर म्हणूनच भर दिला पाहिजे. या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपले प्रयत्न केंद्रित करत आहे. रशिया आणि युक्रेनमधील अलीकडील संकट स्वावलंबनाच्या महत्त्वावर जोर देते. इंधन आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या आयातीवर जास्त अवलंबून राहणे धोक्याचे आहे, हे या युद्धाच्या निमित्ताने भारताच्याच नव्हे तर अख्ख्या जगाच्या लक्षात आले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, आपण आजही अशा अनेक गोष्टी आयात करतो, ज्या अनेक शतकांपूर्वी भारतात आवश्यक कौशल्याने विकसित झाल्या होत्या. त्यामुळे भारतात सहज निर्माण होऊ शकणार्‍या वस्तूही आंधळेपणाने आपण आयात करत आहोत. हे लक्षात घेता, संघ, एक संघटना म्हणून, आपल्या तरुणांना आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये प्रदान करण्यासाठी सरकार आणि इतर संघटनांशी सहयोग-सहकार्य करते.
 
 
 
संघाच्या प्रचारकाने उभारलेले स्वावलंबनाचे उदाहरण
दि. १ नोव्हेंबर, २००६ रोजी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी मध्य प्रदेशातील चित्रकूटला भेट दिली, जिथे त्यांनी संघ प्रचारक आणि समाजसुधारक नानाजी देशमुख यांची भेट घेतली. डॉ. कलाम यांनी सर्वसमावेशक ग्रामीण विकासासाठी नानाजी देशमुख यांच्या प्रयत्नांचे आणि संघ प्रेरित उपक्रमांचे कौतुक केले. डॉ. एपीजे अब्दुल कलाम त्यावेळी म्हणाले होते की, “मी नुकतीच चित्रकूट, मध्य प्रदेशला भेट दिली, जिथे मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक नानाजी देशमुख आणि त्यांच्या ‘दीनदयाळ अनुसंधान संस्थान’ टीम (ऊठख)चे सदस्य यांना भेटलो.” आजघडीला ’ऊठख’ ही भारतासाठी सर्वोत्कृष्ट ग्रामीण विकास मॉडेल विकसित करणारी आणि त्याची यशस्वी अंमलबजावणी करणारी एक नावलौकिकप्राप्त संस्था आहे. ‘डीआरआय’ असे गृहीत धरते की, लोकप्रिय शक्ती राजकीय शक्तीपेक्षा अधिक शक्तिशाली, स्थिर आणि दीर्घकाळ टिकणारी असते. शोषित आणि मागासवर्गीयांसोबत एकजूट होेऊन प्रशासन कौशल्ये प्राप्त करतात. तरुण पिढीमध्ये ‘आत्मनिर्भरता’ आणि उत्कृष्टतेची भावना रुजवल्यास सामाजिक प्रगती आणि समृद्धी शक्य होईल. या तत्त्वाचा वापर करून, ‘डीआरआय’चा चित्रकूटच्या आजूबाजूला सुमारे पाच गावांचा समावेश असलेले १०० समूह विकसित करण्याचा मानस आहे. त्यांनी याआधीच एकूण ५० हजार लोकसंख्येसह १६ ‘क्लस्टर’मध्ये ८० गावे तयार केली आहेत. मी स्वत: पटनी नावाच्या गावाला भेट दिली, जिथे संस्थेने स्वदेशी आणि पारंपरिक तंत्रज्ञानावर आधारित शाश्वत विकासाला चालना दिली. खेड्यांमध्ये ‘आत्मनिर्भरता’ प्राप्त करण्यासाठी क्षेत्रीय अभ्यास अनुकरणीय आणि मूर्त मॉडेल विकसित करण्यात मदत करतात.
 
 
 
मूल्यवर्धन, नाविन्यपूर्ण शेती पद्धती, ग्रामस्थांमध्ये वैज्ञानिक मानसिकता रुजवणे, आरोग्य आणि स्वच्छता सुधारणे आणि १०० टक्के साक्षरतेसाठी प्रयत्न करणे, याद्वारे उत्पन्न मिळवणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. या सर्व विकास उपक्रमांव्यतिरिक्त, संस्था एकसंध, संघर्षमुक्त समाजाला प्रोत्साहन देते. परिणामी, मला समजले की, चित्रकूटच्या आसपासची ८० गावे जवळजवळ पूर्णपणे खटलामुक्त झाली आहेत. तिथे कोणताही वाद न्यायालयात सोडवला जाणार नाही, असे ग्रामस्थांनी एकमताने मान्य केले आहे. नानाजी देशमुख म्हणतात की, “लोक आपापसात लढले, तर विकासाला वेळ नाही. ते स्वत:चा किंवा समाजाचा विकास करू शकत नाहीत.” नानाजींचा हा संदेश समाजाला मिळाला असून, त्यांनी कोणत्याही वादात न पडण्याचा निर्णय घेतला आहे. हे सर्व ‘डीआरआय’च्या ’समाज शिल्पी जोडप्या’ (पदवीधर विवाहित जोडपे), ‘डीआरआय’ने प्रोत्साहन दिलेल्या नवीन समुपदेशन आणि हस्तक्षेप संकल्पनेद्वारे साध्य केले. मित्रांनो, नानाजींच्या गावात तुम्हाला असे कित्येक नायक पाहायला मिळतील. पटकथा लेखक, कवी किंवा दिग्दर्शकासाठी म्हणूनच तर ही सुपीक जमीन ठरावी!
 
 
 
तुम्ही नवीन उंची गाठाल, असा दृढ विश्वास आणि बंधुता एक मजबूत राष्ट्र निर्माण करण्यासाठी आवश्यक आहे. एक अब्ज लोकसंख्येचे राष्ट्र हे करू शकते, यावर संघाची कामगिरी मला विश्वास ठेवण्यास भाग पाडते. संघ आणि त्याचे निकटवर्तीय शिक्षा संस्कृती उत्थान न्यास तसेच, इतर संस्था, नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यासाठी २४ तास कार्यरत आहेत. ज्यामुळे संशोधक, नवोदित आणि कुशल तरुण तयार होतील. जे नोकरी शोधणार्‍यांऐवजी नोकरी देणारे असतील. मजबूत अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी आणि चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी स्वतंत्रपणे विकसित उत्पादनांना पाठिंबा देण्यासाठी उद्योग आणि सरकारचे सतत प्रयत्न हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि तिची शाखा ‘विज्ञान भारती’ यांनी अनेक दशकांपासून चालवलेल्या स्वदेशी चळवळीच्या कार्यामुळे आहे. परिस्थिती बदलत आहे आणि अशी आणखी उत्पादने घरबसल्या तयार करणे आणि ‘मेक इन इंडिया’ उत्पादनांना प्रोत्साहन दिले जात आहे. लोकांच्या राष्ट्रीय भावना आणि भारताचा अभिमान तसेच शत्रू देश चीन आणि पाकिस्तान यांच्याबद्दल वाढता राग हेदेखील त्यासाठी तितकेच कारणीभूत. भारतीय बनावटीच्या वस्तूंचे खरेदीदार आणि विक्रेते यांच्यातील नाते जितके मजबूत होईल तितकी अर्थव्यवस्था वर्षानुवर्षे मजबूत होईल, रोजगार वाढतील. हे मूलत: आम्हाला निव्वळ निर्यातदार बनवेल. म्हणूनच आज प्रत्येक युवक, उद्योग, सरकार आणि सामाजिक संस्थांनी पुढे येण्याची आणि प्रत्येक गावाला ‘स्वावलंबी भारत’ म्हणून विकसित करण्यासाठी संघासोबत काम करण्याची वेळ आली आहे.
 
 
- पंकज जयस्वाल