नवी दिल्ली: रशिया आणि युक्रेन यांच्यामधील युद्ध तीन आठवडे उलटून गेले तरी थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. याच पार्श्वभूमीवर "आम्ही रशियाशी चर्चा करायला तयार आहोत. पण जर ही चर्चा यशस्वी ठरली नाही तर जगाला तिसऱ्या महायुद्धाला तोंड द्यावे लागेल" असा इशारा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी दिला आहे. रशियाकडून युक्रेन वर केल्या जाणाऱ्या हल्ल्यांची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच आहे.
आत पर्यंत या युद्धामुळे युक्रेनमधील १० लाख नागरिकांना देश सोडून जावे लागले आहे. रशियाने सर्वप्रथम सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य करणार नाही असे सांगितले होते पण आता रशियाकडून सर्रास नागरिकांना लक्ष्य केले जात आहे असे झेलेन्स्की यांनी सांगितले आहे. युक्रेन आणि रशिया या दोन देशांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या आता पर्यंत झाल्या असल्या तरी त्यातून कुठलाच समाधानकारक तोडगा अद्याप निघालेला नाही.