मुंबई : एकीकडे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीत समावेश करून घेण्याची मागणी केली. तर दुसरीकडे राजेश टोपे यांची भेट घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर खळबळ उडवून दिली. यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना एमआयएमशी युती करणार नाही, असे पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र, भाजपनेदेखील संजय राऊत यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. भाजप मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत संजय राऊतांना टोला लगावला.
भाजप नेते केशव उपाध्ये यांनी ट्विट केले की, "अहो संजय राऊत साहेब, एमआयएमसुद्धा तुम्हाला लाचार म्हणायला लागले. राजेश टोपेंनी सांगितले, महाविकास आघाडीत घ्यायचा निर्णय वरिष्ठ घेतील. महाविकास आघाडी घडविताना तुमचा सहभाग होता, पण आता तुम्हाला न विचारताच? आता एमआयएम लाचार म्हणते तर टोपे वरिष्ठ निर्णय घेतील सांगून मोकळे होतात." असे म्हणत टोला लगावला.