नवी दिल्ली : न्यूझीलंड मधील हॅमिल्टन येथे सुरु असलेल्या महिला क्रिकेट विश्वचषकातील तिसऱ्या सामन्यात भारतीय महिला संघाकडून वेस्ट इंडिजचा १५५ धावांनी पराभव करण्यात आला. हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना यांच्या दमदार खेळीमुळे भरताला हे यश संपन्न झाले. भारतीय महिला संघाकडून वेस्ट इंडिजसमोर तब्बल ३१८ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. यावेळी स्मृती मानधनाकडून ११९ चेंडूत १२३ धावा करण्यात आल्या. तर हरमनप्रीत कौरने १०९ धावांची शतकी खेळी करत वेस्ट इंडिजसमोर ३१८ धावांचे लक्ष्य ठेवले. मात्र वेस्ट इंडिजच्या संघाला १६२ धावा करणेच शक्य झाले.
झुलन गोस्वामीने रचला मोठा विक्रम!
'चकदा एक्सप्रेस' म्हणून प्रसिद्ध असलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने विश्वचषकाच्या एकदिवसीय सामन्यांत ४० विकेट घेतल्या असून नवा विक्रम रचला आहे. विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर लिन फुलस्टनचा विक्रम झुलनने मोडीत काढला आहे.