'हिजाब' हा मौलिक अधिकार आणि 'टिकली' किंवा कुंकू लावणेही स्वातंत्र्याची पायमल्ली ?

    04-Feb-2022
Total Views |

hijasb.jpg


बंगळुरू :
कर्नाटकमधील एका महाविद्यालयाने काही विद्यार्थिनींना हिजाब घातल्यामुळे काही दिवसांपूर्वी प्रवेश नाकारला होता.खरेतर महाविद्यालयाने प्रत्येक विद्यार्थ्याला कोणत्याही धर्माचे प्रतिनिधीत्व करणारे वस्त्र धारण करू नये असे सांगितले होते. कारण यावरून महाविद्यालयाच्या आवारात हा निर्णय घेण्यापूर्वी याचसंदर्भातील वाद विद्यार्थ्यांमध्ये झाले होते.हिंदू विद्यार्थ्यांना 'भगवे स्कार्फ ' घालण्यासाठीही नकार दिला होता. परंतु काही विद्यार्थिनींना हि बाब आवडली नाही आणि त्यांनी 'हिजाब' घालणे हा आमचा मौलिक अधिकार आहे असे म्हणत न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार संविधानात १४ आणि १५ कलम हा आम्हाला आमच्या धर्माचे पालन करण्याचा अधिकार देतो.
 
का घालतात मुस्लिम महिला हिजाब ?


कुराणात उल्लेख आहे कि स्त्रियांनी असे कपडे घालावेत ज्यानंतर त्यांचे डोळे, चेहरा, हात आणि पाय समोरच्या पुरुषाला दिसत नाहीत. त्यामुळे मुस्लिम महिला बुरखा घालतात.याचा अर्थ हिजाब घालणे हे स्वतःवर बंधन ओढवून घेणेच झाले. आम्हाला हवे तसे कपडे घालू आम्हाला स्वातंत्र्य द्या असे म्हणत हिंदू धर्मावर वारंवार टीका करणारे स्वयंघोषित 'तटस्थ' अशावेळेस शांत का आहेत ?
 
 
शेफाली वैद्य यांना मग विरोध का ?


काही कंपीनीनी आपल्या जाहीरातीत हिंदू संस्कृतीची टिंगल उडविण्याचा प्रयत्न केला होता. त्याला विरोध करत 'सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ' शेफाली वैद्य यांनी 'नो बिंदी नो बिझनेस' असा हॅशटॅग सुरु केला. त्याला विरोध करताना महिलांना काहीही घालण्याचा हक्क आहे. त्यांना स्वातंत्र्य आहे असे म्हणत यावर जोरदार टीका केली. मग शेकडो वर्षांपूर्वीची हि हिजाबची जुनाट आणि स्त्रियांना कमी लेखणारी प्रथेला यांना विरोध करावासा का वाटत नाही ?हिंदू धर्मास वारंवार सुधारणांच्या सूचना देणारे दुसऱ्या धर्माची बाब आली कि शांत का होतात?