सरकारने एसआरए प्रकल्पांसाठी एफएसआय वाढवला

मुंबईतील धोरण आता राज्यातही राबबवणार

    28-Feb-2022
Total Views |
              
bmc
 
मुंबई: राज्य सरकारने मुंबईतील एसआरए प्रकल्पांच्या धर्तीवर संपूर्ण राज्यभरातील एसआरए प्रकल्पांसाठी एफएसआय वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता या प्रकल्पांसाठी आता चार इतका एफएसआय उपलब्ध होणार आहे. राज्यभरातील झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासाला चालना मिळणार असल्याचा दावा जरी सरकार करत आहे.
 
 
एफएसआय वाढवण्याच्या या धोरणाची सुरुवात ही मुंबई महापालिकेतून झाली होती. आता तेच धोरण राज्यभरातील मुंबई महानगर प्रदेशातील सर्व महापालिका आणि नगर परिषदांना लागू होईल. पूर्वी २.५ एकर जागेवर ५०० घरे बांधायची परवानगी आता तीच ६५० घरांपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. राज्यभरातील सर्व शहरे झोपडपट्टीमुक्त करण्याच्या दिशेने टाकलेले हे पाऊल आहे असे नरेडकोचे अध्यक्ष गौतम ठाकर यांनी दिली आहे.