नवी दिल्ली: रशिया- युक्रेन युद्ध आता शिगेला पोहोचलय. युक्रेनने रशियाच्या या आक्रमणाविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली आहे. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी याबद्दल माहिती दिली आहे. संयुक्त राष्ट्रातील रशियाची जागा काढून घेतली पाहिजे अशीही मागणी झेलेन्स्की यांनी केली आहे. रशियाने युक्रेनला बेलारूसमध्ये चर्चेसाठी आमंत्रण दिले आहे, पण हे आमंत्रण युक्रेनने फेटाळले आहे.
"युक्रेनने आंतरराष्ट्रीय न्यायालयात रशियाविरुद्ध अर्ज केला आहे. युक्रेनमध्ये होणाऱ्या नरसंहाराबद्दल रशियालाच जबाबदार धरले पाहिजे. रशियाने त्वरित ही लष्करी कारवाई थांबवावी अशी मी रशियाला विनंती करतो. पुढील आठवड्यात न्यायालयात सुनावणी सुरु होपण्याची अपेक्षा करतो." असे झेलेन्स्की यांनी त्याब्च्या ट्विटर वरील संदेशात म्हटले आहे. दरम्यान जर्मनी, अमेरिका यांसारख्या देशांकडून युक्रेनला आर्थिक तसेच शस्त्रास्त्रांची मदत देण्यास सुरुवात झाली आहे.