"ऑनलाईन परीक्षा हा कायमस्वरूपी उपाय नव्हे" - उदय सामंत

    20-Feb-2022
Total Views |

Uday Samant
 
 
मुंबई : शनिवार, दि. १९ फेब्रुवारी रोजी चिपळूण येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे उपस्थित होते. सध्या सुरू असलेल्या ऑनलाईन शिक्षणाच्या वादाबद्दल विद्यार्थांकरीता त्यांनी आपलं मत पत्रकारांसमोर मांडलं. "ऑनलाईन परीक्षा म्हणजे कायमस्वरूपी उपाय नव्हे.", असं वक्तव्य त्यांनी यावेळी केले.
 
 
 
"ऑनलाइन परीक्षेत कॉपी करण्याचे प्रमाण वाढत असेल आणि त्याबद्दल पुराव्यानिशी सिद्ध झाल्याच्या तक्रारी आल्या, तर त्या विद्यार्थ्यांवर नक्कीच कारवाई करण्यात येईल. विद्यार्थ्यांना वाटत असेल तर ऑनलाईन परीक्षा म्हणजे कायमस्वरूपी उपाय नव्हे. हा विद्यार्थ्यांचा गैरसमज आहे.", असं उदय सामंत म्हणाले. "ऑनलाइन परीक्षेत होणारे कॉपीबहाद्दरांचे प्रकरण लक्षात घेता लवकरच ऑफलाइन परीक्षा सुरू कराव्या लागतील. तसेच ऑनलाईन परीक्षेत कॉपी करणाऱ्यांवर कारवाई करावी लागेल. कोचिंग क्लासेस ग्रुपकडून किंवा वैयक्तिक कोणीही असू दे; कॉपी करण्यास प्रवृत्त करणाऱ्यांवर पोलीस कारवाई होणारच.", असेही ते पुढे म्हणाले.