अहवाल नकारात्मक आल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

एसटी संपाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलीस बंदोबस्त वाढला

    17-Feb-2022
Total Views |
                             
st strike
 
 
मुंबई: एसटी विलनीकरणासाठी नेमलेल्या समितीच्या अहवालावर २२ फेब्रुवारी रोजी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या समितीचा अहवाल विरोधात गेल्यास एसटी कर्मचाऱ्यांकडून तीव्र आंदोलन केले जाणार अशी चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेरही पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मुंबईतील सर्वच महत्वाच्या शासकीय इमारती म्हणजे मंत्रालय, वर्षा बंगला यांच्या बाहेरही पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. २२ फेब्रुवारी रोजी राज्यभरातून एसटी कर्मचारी मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबईत कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे.
 
 
 
मागच्यावर्षी ऑक्टोबरमध्ये सुरु झालेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजूनही मिटलेला नाही. कर्मचाऱ्यांच्या विलनीकरणाच्या मागणीचा अभ्यास करून या बद्दल निर्णय देण्यासाठी सरकारने एक समिती नेमली होती. या समितीला अहवाल सादर करण्यासाठी समितीला मुदतवाढ देण्यात आलेली होती. समितीचा अहवाल १८ फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. सरकारच्या बाजूने परिवहन मंत्री अनिल परब यांनी "समिती जो अहवाल देईल तो मान्य असेल" असे सांगितले आहे. "समितीचा अहवाल सकारात्मकच येईल असा आम्हाला विश्वास आहे आणि आता सरकारला एसटीचे विलानीकरण करावेच लागेल" अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले.