नागपूर : विधानसभेताल शेवटच्या दिवशी प्रस्तावावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मविआचा चांगलाच समाचार घेतला. उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका करताना ते विधानसभेत म्हणाले की, "आमच्यावर आरोप केले जात आहेत की आम्ही सूडाचे राजकारण करतो, पण कंगना राणौत आणि नवनीत राणा यांचे काय झाले? बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतचे घर तोडण्यासाठी वकिलाला 80 लाख दिले. उद्योजकांकडे टक्केवारी मागितली."
शिवसेनेच्या प्रवक्त्यांवर टीका करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "महापालिकेने वकिलाला तब्बल 80 लाख रुपये दिले होते. टोमणेसेनेच्या नव्या प्रवक्त्यांनी जिजाऊची उपमा देण्याचे काम केले. बाळासाहेब आम्हाला म्हणायचे तुम्ही लढा मी तुमच्या पाठिशी आहे, पण हे तुम लढो हम कपडे संभालते अशी भूमिका घेत होते. पण, कंगणाचे घर पाडण्यासाठी मनपाचे 80 लाख रुपये वकीलाला दिले. महाविकास आघाडी विरोधात बातम्या लावणाऱ्या पत्रकारांना त्रास दिला गेला. " असे गंभीर आरोप मुख्यसंत्र्यांनी केले.
नोव्हेंबर 2020 मध्ये कंगना राणौत हिच्या मुंबईतील पाली हिल्स येथील घरावर मुंबई महापालिकेने कारवाई केली होती. ते घर तिचे ऑफिसदेखील होते. ती तिथूनच आपली कामे पाहत असे. मात्र कंगना राणौतच्या या घराचा काही भाग अनधिकृत असल्याचे सांगत मुंबई महापालिकेने तिच्या घराच्य काही भागावर बुलडोजर चालवला होता. अधिकाऱ्यांनी स्वतः हजर राहून तिच्या घरावर कारवाई केली होती. यानंतर कंगना राणौत देखील आपल्या घरावर कारवाई केल्याप्रकरणी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला सोशल मीडियाद्वारे धारेवर धरले होते.