बफर झोन असलेल्या भूखंडाचे जतन करणे सगळ्य़ांची जबाबादारी - रविंद्र चव्हाण

बफर झोन असलेल्या भूखंडाचे जतन करणे सगळ्य़ांची जबाबादारी - रविंद्र चव्हाण

    26-Dec-2022
Total Views |


 
rotary park
 
 
डोंबिवली: शहरातील बफर झोन असलेल्या रोटरी गार्डनच्या भूखंडाचे जतन करणे हे सगळ्य़ांची महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहू आणि मुलांच्या खेळांसाठी प्राधन्य देऊ असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिले.
 

रोटरी क्लबच्या माध्यमातून उभारलेल्या चिल्ड्रेन पार्कचे मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी चव्हाण बोलत होते. रोटरीयन्सनी उभारलेले रोटरी गार्डन 1986 पासून डोंबिवलीचा ठळक लॅडमार्क बनला आहे. कोरोनाच्या काळात बंद असल्यामुळे रोटरी गार्डनची दुरावस्था झाली होती. या गार्डनचे नुतनीकरण करण्यात आले. या गार्डनमध्ये येणा:या शहरातील मुलांची वाढती संख्या पाहून झोपाळे, सीसॉ, घसरगुंडी , जंपिंग रोप यासारखी सर्व क्रीडासाधने विविध प्रकारची खेळणी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि मैदानी खेळांसाठी क्रीडागण अशा विविध सुखसोयींनी सुसज्ज असणारे रोटरी चिल्ड्रेन्स पार्क उभारण्यात आले आहे. या लोकार्पण सोहळ्य़ाला संस्थेचे माजी अध्यक्ष उल्हास कोल्हटकर, अध्यक्ष विजय डुंबरे,माधव सिंग, गायत्री श्रीनिवासन, अभय कुलकर्णी, भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे,डोंबिवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष नंदू परब, भाजपाचे पदाधिकारी, संस्थेचे पदाधिकारी , नागरिक उपस्थित होते.
 

चव्हाण म्हणाले, डोंबिवली शहरातील अडीच एकर जागेवर रोटरी गार्डन विस्तारलेले आहे. हे शहरातील सर्वात मोठे असलेले गार्डन आहे. रोटरीयन्स यांनी हे गार्डन चांगले प्रकारे जपले आहे. या गार्डन मध्ये लहान मुलांपासून वयोवृध्दांर्पयत सर्व मुले येत असतात. या गार्डनमध्ये पाच वर्षाखालील व पाच वर्षावरील मुलांसाठी दोन वेगवेगळे विभाग केले आहेत. त्यांच्यासाठी नवीन खेळणी बसविली आहे. त्यासाठी वीस लाखांपर्यतचा खर्च केला आहे. नवीन खेळ ऑलिम्पिकमध्ये येत आहेत. या सर्व खेळांना डोंबिवलीत प्रोत्साहन दिले पाहिजे. रोटरीयन्स दरवर्षी एखादा प्रकल्प हाती घेऊन तो सिध्दीस नेण्याचा प्रयत्न करीत असते. त्यांनी खेळाडूंना दत्तक घेण्याचा आवाहान केले असून त्यांनी ते स्वीकारले आहे असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
 
 
 
--------------------------------------------------------------