शिवडी-नाव्हा शिवा ब्रिज लगत ५ फूट उंच संरक्षक भिंत

    26-Dec-2022
Total Views |

शिवडी-नाव्हा शिवा ब्रिज


मुंबई : एमएमआरडीएने मुंबई पारबंदर ( शिवडी-नाव्हा शिवा) प्रकल्पात पुलाच्या बाहेरील बाजूस वाहतुक सुरक्षिततेसाठी संरक्षण कठडा ( भिंत) उभारण्यास सुरुवात केली आहे. या कठड्याची एकूण उंची १५५० मिमी( सुमारे ५फूट) आहे. या संरक्षण कठड्याच्या खालच्या भागात ९०० मिमी कॉंक्रिटचे बांधकाम असून त्यावर दक्षिण कोरियातुन मागविलेल्या ६५० मीमी उंचीच्या भागात स्टील रेलिंगचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.

प्रकल्पामध्ये ५ फूट उंचीची संरक्षण भिंत उभारणे प्रस्तावित होते. तथापि, त्यामुळे प्रवाशांच्या समुद्री दृश्यांत अडथळा निर्माण झाला असता. या सुधारित डिझाईनमुळे समुद्री दृश्यांचा तसेच फ्लेमिंगो पाहण्याचा आनंद प्रवाशांना घेता येईल. संरक्षण कठडा उभारण्यासाठी आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन EN १३१७ करत मुंबई पारबंदर प्रकल्पासाठी गॅल्वनाइज्ड स्टीलच्या रेलिंगचा वापर करण्यात आला असून याची प्रत्यक्ष चाचणी करण्यात आली आहे.


संरक्षण कठड्याच्या नवीन डिझाइनची चाचणी यूके आणि दक्षिण कोरियामध्ये यशस्वीरित्या करण्यात आली आहे. सुरक्षिततेबरोबरच, प्रवाशांना समुद्र आणि फ्लेमिंगोच्या दृश्यांचा आनंद घेता येईल अशा पद्धतीने त्याची रचना करण्यात आली आहे. आम्ही एका महिन्यात कास्टिंगच्या एकूण लांबीच्या १२% काम साध्य केले आहे."* अशी माहिती एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस.व्ही. आर. श्रीनिवास यांनी दिली.