मुंबई : लोकसभेत आज नियम १९३ अतंर्गत ड्रग्ज संदर्भात लघू चर्चा पार पडली. या विषयावर बोलताना शिंदे गटाचे लोकसभेतील खासदार गटनेते शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून रिया चक्रवर्तीच्या फोनवर एयू नावाने 44 फोन कॉल होते. असे म्हणत गंभीर आरोप केले आहेत. एयू म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे असं बिहार पोलिसांनी सांगितलं आहे. लोकसभेत बोलताना राहुल शेवाळे यांनी हा गंभीर आरोप केलाय.
दिशा सालियान आणि इतरांच्या फोनवर आदित्य ठाकरेंच्या नावानं फोन आल्याचा दावा बिहार पोलिसांनी केला आहे. "एयूचा विषय खूप गंभीर आहे. एयू म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे असा आहे. बिहार पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. या प्रकरणी सीबीआय, बिहार पोलिस आणि मुंबई पोलिसांचा तपास वेगवेगळा आहे. त्यामुळे याची माहिती लोकांना मिळाली पाहिजे. त्यामुळं मंत्र्यांद्वारे मी जाणू इच्छितो की, दिशा सालियान आणि सुशांत सिंह राजपूत यांच्यामध्ये झालेल्या मेसेजमधील चर्चेची चौकशी झाली पाहिजे." अशी मागणी शेवाळे यांनी यावेळी केली.