आतंकवादी चळवळींवर भाष्य करणाऱ्या वसंत वसंत लिमये यांच्या कादंबरीचे शनिवारी मुंबईत प्रकाशन

    21-Dec-2022
Total Views |

vv limaye


मुंबई : 'टार्गेट असद शाह' ही लेखक वसंत वसंत लिमये यांनी लिहिलेली कादंबरी २४ डिसेम्बर रोजी प्रकाशित होत आहे. इंद्रायणी साहित्य तर्फे प्रकाशित झालेली वसंत यांची ही तिसरी थरार कादंबरी. लॉक ग्रिफीन, विश्वस्त या दोन गाजलेल्या कादंबऱ्या लिहून झाल्यावर ही तिसरी कादंबरी त्यांनी लिहिली आहे.
 
दादर पश्चिम येथील सावरकर स्मारकात या कादंबरीचे प्रकाशन २४ डिसेम्बर रोजी संध्याकाळी ठीक ७ वाजता होत आहे. कार्यक्रमासाठी अभिनेते सचिन खेडेकर, निवृत्त लेफ्टनन्ट जनरल राजेंद्र निंभोरकर, अभिनेत्री नीना कुलकर्णी, साहित्यिक उदय निरगुडकर, साहित्यिक दिनकर गांगल, साहित्यिक दीपक करंजीकर आणि सहाय्य्क पोलीस आयुक्त संगीत पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली आहे. कार्यक्रमाचे सूत्रधार सुनील बर्वे तसेच स्वागतोतोत्सुक वसंत वसंत लिमये यावेळी उपस्थित असतील.
 
आतंकवाद विरोधी कारवाया उलगडत जाणारी एक थरारक कथा या कादंबरीतून वाचायला मिळेल. सत्तेचे राजकारण, आर्थिक उलाढालीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न, एका मोठ्या नेत्याच्या हत्येचा कट आणि त्याभोवती फिरून आतंकवादी चळवळींतून होणारे समाज दर्शन या कादंबरीत दिसून येते. या सर्व गदारोळात कुतूहलापोटी सामान्य माणूस गोवळ जातो तेव्हा त्याची झालेली फरफट यातून दिसून येते.
 
दिनांक २५ डिसेम्बर रोजी पुण्यात शकुंतला जगन्नाथ शेट्टी सभागृहातही या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.