पंजाबी गायक दलेर मेहंदीला सर्वोच्च न्यायालयाचा दणका

    02-Dec-2022
Total Views |

daler
 
 
 

दीड एकर परिसरात पसरलेले फार्म हाऊस सील

तलावानजीक फार्म हाऊस बांधल्याने कारवाई
 
 
मुंबई – कायम वादात असलेला पंजाबी गायक दलेर मेहंदीला सर्वोच्च न्यायालयाने जोरदार दणका दिला आहे. बेकायदेशीरपणे फार्म हाऊस बांधल्याच्या आरोपाप्रकरणी त्याचे हरियाणातील गुरुग्राम येथील फार्म हाऊस सील करण्यात आले आहे. त्याबरोबरच अन्य दोन फार्म हाऊसदेखील सील करण्यात आले आहे. सोहना येथील दमदमा तलावाजवळ स्थित हे तीनही फार्म हाऊस बेकायदेशीरपणे बांधण्यात आले असून दलेर मेहंदी याचे फार्म हाऊस जवळपास दीड एकर परिसरात पसरले आहे.
 
तलावाच्या परिसरात हे अनधिकृत फार्महाऊस बांधण्यात आल्याने अरवली टेकड्यांचे नुकसान होत होते. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने कारवाईचे आदेश दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. अरवली परिक्षेत्रात कोणतीही परवानगी न घेता हे फार्म हाऊस बांधण्यात आले होते.
 
दलेर मेहंदीवर याआधी झाले होते मानवी तस्करीचे आरोप
 
दरम्यान, दलेर मेहंदी आणि वाद हे समीकरण काही नवीन नाही. 2003 मध्ये त्याला मानवी तस्करीच्या आरोपाखाली पटियालाच्या सत्र न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्याला नंतर सत्र न्यायालयात आव्हान देण्यात आले. अखेर 14 जुलै 2022 रोजी अटक करून त्याला पटियाला सेंट्रल जेलमध्ये पाठवण्यात आले. यानंतर पंजाब हरियाणा उच्च न्यायालयात त्यांच्या वतीने जामिनासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. सुरुवातीला त्याची याचिका फेटाळण्यात आली, परंतु नंतर सप्टेंबर 2022 मध्ये त्याची सुटका करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे, दलेर मेहंदी आणि त्याचा भाऊ शमशेर सिंग यांच्यावर एकूण 31 गुन्हे दाखल आहेत.