मुंबई :कर्नाटकातील काही मंदिरातील 'सलाम' आरतीचे नाव बदलण्यात आले आहे. आता ती संध्या आरती म्हणून ओळखली जाईल. हिंदुत्ववादी संघटनांच्या मागणीवरून हा निर्णय घेण्यात आला आहे. टिपू सुलतानच्या नावाने केले जाणारे विधी रद्द करण्याची मागणी या संघटनांनी राज्य सरकारकडे केली होती. यात सलाम आरतीचा समावेश होता.मेलकोटे येथे ऐतिहासिक चालुवनारायण स्वामी मंदिर आहे. जिथे हैदर अली आणि त्याचा मुलगा टिपू सुलतान यांच्या कारकिर्दीपासून रोज संध्याकाळी ७ वाजता सलाम आरती होत असे . १८ व्या शतकातील म्हैसूरचा शासक टिपू याने या मंदिरांना दिलेल्या भेटीदरम्यान आरतीला नाव दिले होते, असे मानले जाते.
हिंदू मंदिरांवर देखरेख करणारे राज्य प्राधिकरण मुझराई यांनी शनिवारी सहा महिन्यांच्या जुन्या प्रस्तावाला मंजुरी दिली.विद्वान आणि कर्नाटक धार्मिक परिषदेचे सदस्य, कशेकोडी सूर्यनारायण भट यांनी त्याचे नाव बदलण्याची मागणी केली. भट म्हणाले होते की, सलाम हा शब्द टिपूने दिला होता, तो आमचा नाही. यामुळेच आता 'सलाम' आरतीचे नाव बदलून 'संध्या' आरती ठेवण्यात आले आहे.
मुझराईच्या मंत्री शशिकला जोल्ले म्हणाल्या, ही फारसी नावे बदलून मंगला आरती नमस्कार किंवा आरती नमस्कार यांसारखी पारंपारिक संस्कृत नावे कायम ठेवण्याचे प्रस्ताव आणि मागण्या केल्या होत्या. हिंदू धार्मिक संस्था आणि चॅरिटेबल एंडोमेंट्स विभाग (मुझराई) मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अंतिम मंजुरीची प्रतीक्षा करत होते. अधिकृत आदेशानंतर केवळ मेलकोटमध्येच नव्हे तर कर्नाटकातील सर्व मंदिरांमध्ये आरती सेवांचे नाव बदलले जाईल.आणि त्यामुळेच 'सलाम' आरतीचे नाव बदलण्यात आले आहे.