श्री गणेश मंदिर संस्थान शतक महोत्सवी वर्ष

    08-Nov-2022   
Total Views |

श्री गणेश मंदिर 
 
 
 
श्री गणेश मंदिर संस्थान शहराचे ग्रामदैवत असून याची स्थापना 1924 साली झाली. 2023-24 या वर्षात मंदिर 100व्या वर्षात पदार्पण करीत असल्याने हे वर्ष शतक महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे. त्यानिमित्त संस्थानाच्या कार्यासंदर्भात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.
 
 
मंदिराच्या स्थापनेपासून सर्व विश्वस्तांनी हे मंदिर केवळ धार्मिक कार्याकरिता मर्यादित न ठेवता सामाजिक मंदिर म्हाणून विकसित करण्याचा प्रयत्न सातत्याने केला आहे.धार्मिक उपक्रमांबरोबरच शैक्षणिक, वैद्यकीय, क्रीडा, पर्यावरण, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम सातत्याने यशस्वीपणे आयोजित केले जातात. मंदिरामध्ये देवाच्या दानपेटीत जमा होणारा निधीचा वापर समाज्यातील आबालवृद्धांसाठी उपरोक्त विविध उपक्रमांमध्ये विनियोग केला जातो. मंदिरात होणार्‍या अनेक उपक्रमांपैकी काही उपक्रम खालील प्रमाणे आहेत.
 
 
धार्मिक
 
1.मंदिरातील देव-देवतांचे जन्मोत्सव, याग, पूजा यांचे आयोजन. 2. वर्षभर काकड आरती व शेजारती तसेच दररोज कीर्तन व प्रवचन. 3. नागरिकांच्या देव-देवतांचे दैनंदिन अभिषेक, सहस्रावर्तन, लघुरुद्र व भक्तांच्या स्वहस्ते पूजाविधी. 4. दीपोत्सव, नवरात्र, माघी गणेशोत्सव, तुलसीविवाह, भागवत सप्ताह, अथर्वशीर्ष व श्रीसूक्त पठण. 5. सामुदायिक श्री सत्यनारायण/श्री सत्यविनायक महापूजा आयोजन 6.नागरिकांच्या सहभागासाठी श्रीगणेश गाभारा पूजा, गणेशसांज आरतीचे आयोजन सांस्कृतिक. 1.गेल्या 40 वर्षांपासून संगीत क्षेत्रातील तरुण तसेच अनुभवी कलाकारांसाठी रविवारी संगीत सेवा आयोजित केली जाते. 2. दिवाळी पहाटनिमित्त युवाशक्ती दिन आयोजन. 3. वार्षिक संगीतोत्सव 4.विविध सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन.
 
 
 
 
श्री गणेश मंदिर
 
 
 
 
शैक्षणिक
 
1.परिसरातील गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत रु.15 लाख वार्षिक. 2.व्यक्तिमत्त्व विकास मार्गदर्शनपर व्याख्याने. 3.योग, तत्त्वज्ञान, अध्यात्म, प्राणायाम, संस्कृत गीता पठण, पार्थिवपूजन याबाबत कार्यशाळा. 4. संस्कृती, धर्मजागृती, सामाजिक, आरोग्यविषयक व्याख्यानमाला प्र. के. अत्रे ग्रंथालय/वाचनालय - टिळक पथ, डोंबिवली (पूर्व) 1. मोफत वृत्तपत्र वाचनालय 2.सुमारे तीन हजार सभासदांसह सुमारे 40 हजार पुस्तके/मासिकांचे संगणकीकृत ग्रंथालय. 3.महाविद्यालयीन तसेच पदव्युत्तर अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अभ्यासिका.दरमहा 250 विद्यार्थी याचा लाभ घेतात. 4. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीस्वतंत्र संगणक कक्ष. 5. गृहिणी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी संगणक प्रशिक्षण केंद्र. 6. दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी ध्वनिमुद्रित पुस्तकालयाची सोय. 7. वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी ‘टॅली’, ‘अकाऊंट्स’ लेखन व टॅक्सेसबाबत मोफत प्रशिक्षण व मार्गदर्शन 8. स्वयंरोजगार निर्मितीच्या दृष्टीने महिलांना मोफत प्रशिक्षण दिले जाते. 9. ज्येष्ठ नागरिक आणि गृहिणी यांच्यासाठी संगणक प्रशिक्षणाची सोय.
 
 
 
सामाजिक
 
 
1. चैत्र शुद्ध प्रतिपदेला भारतीय नववर्ष स्वागतयात्रा आयोजन. 2. नैसर्गिक आपत्तीग्रस्त बांधवांना सहकार्य. 3. जलसंवर्धनासाठी लोकसहभागातून विविध उपक्रम. 4. सामाजिक क्षेत्रात सेवाभावी कार्य करणार्‍या संस्थांना आर्थिक सहकार्य. 5. सेवावृत्तीने कार्य करणार्‍या संस्थांसाठी सर्व सोयींसह सुसज्ज पाच सभागृहे. 6. अंत्येष्टी क्रियाकर्म स्वतंत्र कक्ष. 7. गणेशवाटिका विरंगुळा कट्टा व ओपन जिम (ज्येष्ठ नागरिकांसाठी) गणेश पथ, डोंबिवली (पूर्व) 8. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात वयवर्ष 3 ते 15 मधील मुलांसाठी खेळण्याची सोय, नागरिकांसाठी ’जॉगिंग ट्रॅक’ पर्यावरण: 1. एमआयडीसी फेज - 2, डोंबिवली (पूर्व) येथे निर्माल्यापासून नैसर्गिक खतनिर्मितीसाठी श्रीगणेश निर्माल्य खत प्रकल्प.
 
 
 
2.पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती, आकाशकंदील तसेच नैसर्गिक रंग बनविण्याच्या कार्यशाळा आयोजन. 3. पर्यावरणविषयक जनजागृतीचे विविध कार्यक्रम वैद्यकीय : 1. गरजू रुग्णांना आर्थिक मदतीचा हात. 2.नेत्रदान जनजागृती अभियान/नोंदणी. 3. रक्तदान ,वैद्यकीय शिबिरे चाचण्यांचे आयोजन 4.निरोगी भरत मासिक व्याख्यनमाला आयोजन 5.माफक दारात खात्रीशीर सोनोग्राफी सेवेसाठी श्री गणेश अल्ट्रासोनोग्राफी सेंटर, गणेश मंदिर 1 ला मजला, डोंबिवली (पूर्व)
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.