साष्टी परिसराचा गौरवशाली इतिहास सांगणाऱ्या साष्टीच्या गोष्टी

    06-Nov-2022
Total Views |

itihas
मुंबई : भारतीय इतिहास संकलन समिती, कोकण प्रांत आयोजित बोरिवली येथे पहिल्या इतिहास कट्ट्याचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात साष्टीच्या गोष्टी हा विषय इतिहास अभ्यासक रविराज पराडकर. आपल्या ओघवत्या वाणीतून सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे उदघाटन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे इतिहास व पुरातत्वज्ञ, प्रा.डॉ.अरविंद जामखेडकर करणार आहेत. अरविंद जामखेडकर हे भारतीय इतिहास अनुसंधान परिषद(भारत सरकार नवी दिल्ली) चे माजी अध्यक्ष व डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ, पुणे येथील माजी कुलपती आहेत.
 
या कार्यक्रमाच्या वेळी विशेष उपस्थिती न्माननीय उपस्थिती आमदार मनीषाताई चौधरी व पूर्व उपमहापौर विनोदजी घेडिया यांची असणार आहे, तसेच नगरसेवक जितेंद्र पटेल हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित असतील. हा पहिला इतिहास कट्टासला तरी प्रत्येक महिन्याला या इतिहास कट्ट्याचे आयोजन करण्याचे आयोजकांनी ठरवले आहे.
 
६. नोव्हेंबर २०२२ रोजी संध्याकाळी ६.०० वाजता बोरीवली पश्चिमेतील देवीदास रोड वरील, बोरीवली सांस्कृतिक केंद्राचे "वनविहार" येथील मुक्तपीठात हा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून सर्वांसाठी खुला आहे.