ऑर्डर ट्रॅक करायची आहे? गुगलचे हे नवीन फीचर बघा

    04-Nov-2022
Total Views |
google
 
 
नवी दिल्ली : देशात ईकॉमर्स क्षेत्र झपाट्याने वाढत असताना, जगातील सर्वात लोकप्रिय सर्च इंजिन गुगलने या क्षेत्रासाठी एक नवीन फीचर आणले आहे. ईकॉमर्स क्षेत्रात सर्वात महत्वाचे असते ते म्हणजे ऑर्डर ट्रॅकिंग. गुगलने याच महत्वाच्या प्रश्नाला केंद्रस्थानी ठेवून हे नवीन फीचर डिझाईन केले आहे. या नव्या फीचरनुसार आपण आता जी - मेल इनबॉक्स मधून आपण बुक केलेली ऑर्डर आपल्या जीमेल वरून ट्रॅक करू शकतो. लवकरच आपल्या जीमेल इनबॉक्समध्ये हे फीचर ऍड झालेले आपल्याला दिसेल असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. याचा अंतिमतः ग्राहकांना फायदाच होणार आहे.
 
आपण सर्वच जण सणासुदीच्या दिवसांतच नव्हे तर इतरही काळात ऑनलाईन शॉपिंग करत असतो या काळात आपल्याला आपली ऑर्डर ट्रॅकिंग करण्यासाठी बरेचदा खूप अडचणी येतात. याच अडचणींवर उपाय म्हणून हा पर्याय गुगल कडून आला आहे. या फीचरचा उपयोग आपल्याला आपली ऑर्डर दिल्यापासून ती आपल्याला मिळेपर्यंतच्या सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेवता येणार आहे. त्यात जेव्हा आपली ऑर्डर सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन डिलिव्हरीसाठी निघेल तेव्हा 'लेबल क्रिएटेड' असा मेसेज आपल्याला मिळेल. जेव्हा आपली ऑर्डरची शिपमेंट होईल आणि ती ऑर्डर आपल्याला उद्या मिळणार अशी शक्यता जेव्हा असेल तेव्हाही आपल्याला गुगलकडून ते कळवणारा मेसेज येईल. त्यानंतर जेव्हा त्याची डिलिव्हरी केली जाईल तेव्हा डिलिव्हरीचाही मेसेज आपल्याला मिळेल अशी संपूर्ण प्रक्रिया असणार आहे.
 
या नवीन फीचरचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला कधीही आपली ऑर्डर रद्द करण्याचीही सोय या फीचर मध्ये असणार आहे. यातून ग्राहकांना आपल्या ऑर्डर बद्दल सातत्याने त्याचे अपडेट देणारे मेसेजेस मिळत राहणार आहेत. त्यामुळे आपल्याला आपली ऑर्डर प्राप्त करण्यासाठी आणि त्याच माहिती मिळवण्यासाठी हे नवीन फीचर नक्कीच फायदेशीर ठरेल असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.