मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडणार महासंस्कृती कोकण सन्मान २०२२
04-Nov-2022
Total Views |
मुंबई : गुरुवार, १० नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ४.०० वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉईंट, मुंबई येथे सायंकाळी ४.०० वाजता महासंस्कृती कोकण सन्मान हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत तर सांस्कृतिक वनमंत्री सुधीर सुधीर मुनगंटीवार आणि शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
महासंस्कृती, हे असे एक नाविन्यपूर्ण, संघटित, आधुनिक आणि एकमेव व्यासपीठ आहे जिथे एकाच वेळी एकाच व्यासपीठावर महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील अभ्यासक, लेखक, संशोधक, तज्ञ्, उद्योजक, जुन्या जाणकार व्यक्ती आणि संस्था, इन्फ्लुएन्सर्स आणि महाराष्ट्रातील तरुण वर्ग आपल्या समृध्द वारशाचे जतन आणि प्रचार करण्यासाठी एकत्रित आला आहे.
"महासंस्कृती कोकण सन्मान २०२२" या कार्यक्रमात ज्यांच्या ज्ञानामुळे आणि अथक परिश्रमामुळे कोकणातील अमूल्य आणि दुर्मिळ वारसा जतन राहिला आहे. उद्योग क्षेत्रात ज्यांनी अभूतपूर्व यश मिळवलेले आहे, अशा तज्ञ्, अभ्यासक, लेखक, संवर्धक, लोक कलाकार, उद्योजक, संस्था आणि इन्फ्लुएन्सर्स यांना महासंस्कृतीच्या वतीने विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच यावेळी "The Unexplored Legacy" या मासिकाचे प्रकाशन सुद्धा होणार आहे.