कोकणात जाणाऱ्या पर्यटकांना कोकण रेल्वेकडून दिलासा !

    29-Nov-2022
Total Views |

कोकण रेल्वे
 
 
 
 
मुंबई : डिसेंबरमधील ख्रिसमस आणि नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक पर्यटक कोकणाच्या दिशेने रवाना होतात. याच पार्श्वभूमीचा विचार करून पर्यटकांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेने चार गाड्यांना अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. गांधीधाम-तिरूनेलवेली, भावनगर-कोचुवली, जामनगर ते तिरूनेलवेली तसेच हाप्पा-मडगाव एक्स्प्रेसला स्लीपर श्रेणीचा प्रत्येकी एक डबा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये गांधीधाम एक्स्प्रेसला २८ नोव्हेंबरपासून २९ डिसेंबरपर्यंत, भावनगर-कोचुवेली एक्स्प्रेसला २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबरपर्यंत, जामनगर तिरूनलवेली एक्स्प्रेसला २ ते २७ डिसेंबर या कालावधीसाठी तर हाप्पा-मडगावला ३० नोव्हेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीसाठी स्लीपर श्रेणीचा डबा वाढविण्यात आला आहे.
 
सुट्टीच्या कालावधीत अनेकांची पसंती कोकण असते. त्यामुळे पर्यटकांना प्रवासाच्या समयी कोणत्याही अधिक समस्या उदभवू नये, यासाठी कोकण रेल्वेने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.